‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार’, सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांचं वक्तव्य
ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकलाय. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं वक्तव्य केलंय.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या गोव्यात आहेत. अशावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या घरावरही छापा टाकलाय. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं वक्तव्य केलंय.
‘संजय राऊत झुकत नाहीत, मग कुटुंबाला धमक्या’
“अनेक वर्षापासून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिलो जातोय. माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार, माझे सहकारी यांना केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास दिला जातोय. पण त्याची पर्वा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुगांत जायला आणि मरायलाही तयार आहे. मी काळजी करत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसंच सुजित पाटकर हे माझे नातेवाईक आहेत. तुम्ही कोण आहात? बघून घेऊ आम्ही. अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण सुरु आहे. संजय राऊत झुकत नाहीत, वाकत नाहीत, मग कुटुंबाला धमक्या द्यायच्या, बदनामी करायची, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणायचा. पण करु द्या, 2024 पर्यंत हे चालेल, 2024 नंतर पत्ते उलटे पडलेले असतील”, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय.
किरीट सोमय्यांचा राऊतांना थेट इशारा
सुजित पाटकर आणि तुमचा संबंध काय? उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे उद्योगधंदे मान्य करा, अन्यथा उद्या चार वाजता पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत, सुजित पाटकर, प्रविण राऊत हे तिघे मिळून काय काय उद्योगधंदे करतात, ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर किरीट सोमय्या हळूहळू टप्प्याटप्प्याने मांडत आहे. उद्या संजय राऊत यांच्या अजून एका उद्योगधंद्याचा पर्दाफाश पुण्यात होणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
‘अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट? एकदा सांगून टाका’
त्याचबरोबर प्रवीण राऊत आणि कंपनी आलल्याला कशाप्रकारे मदत करते हे लोकांना कळू द्या. आतली गोष्ट काय आहे? कुणा कुणाला काय मिळालं आहे? आपल्याला अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट मिळाला? हे देखील एकदा सांगून टाका, असं थेट आव्हानच सोमय्या यांनी राऊतांना दिलंय.
इतर बातम्या :