हृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर! मुंबईतील कोणत्या रुग्णालयात उपचार?

चेहऱ्यावर थकवा, काहीसा अशक्तपणा! एअर ऍब्युलन्समधून बाहेर येताना संजय शिरसाट यांनी काय केलं? मुंबईतून एक्स्क्लुझिव्ह दृश्य समोर

हृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर! मुंबईतील कोणत्या रुग्णालयात उपचार?
संजय शिरसाट मुंबईत दाखलImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 10:07 AM

आशिष कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे मुंबईत दाखल झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर (Heart Attack) संजय शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आलं. औरंगाबादमध्ये सोमवारी शिरसाट यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र औरंगाबादमधील रुग्णालयातून शिरसाट यांना आता थेट मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मंगळवारी सकाळी तातडीने त्यांनी त्यासाठी मुंबईत आणण्यात आलं.

मुंबई विमानतळावर एअर ऍब्युलन्सनने दाखल झाल्यानंतर विमानतळावरील रुग्णवाहिकेतून त्यांना बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर एका खासगी कार्डियाक रुग्णावाहिकेत त्यांना शिफ्ट करण्यात आलं. या कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना आता वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

थकवा, अशक्तपणा

मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट हे स्वतः चालत गेले. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला धरुन चालत जात शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढताना दिसले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. तसंच काहीसा अशक्तपणाही संजय शिरसाट यांना आल्याचं समोर आलेल्या दृश्यांमध्ये दिसलं.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी दुपारी औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थ वाटू लागल्यानं तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं आहे. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.

संजय शिरसाट यांच्यासोबत त्याचा परिवार, निकटवर्तीय आणि काही कार्यकर्ते असल्याचंही पाहायला मिळालं. आज सकाळी एअर एम्ब्युलन्समधून तातडीन संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावरुन मुंबईला हलवण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं.

डॉक्टरांनी काय म्हटलं?

काल दुपारी 4-4.30 वाजता शिरसाट यांचा बीपी वाढला होता. संजय शिरसाट यांना श्वास घेण्यातही काहीशा अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सर्व तपासण्याकरुन त्यांना बीपी आणि हृदयासाठीची औषधं देण्यात आली, असं डॉक्टरांनी सांगितलं.

श्वासाचा आणि बीपीचा त्रास कमी झाल्याचं कळल्यानंतर त्यांना मुंबईला शिफ्ट करण्यात आलंय. संजय शिरसाट यांची एजिओप्लास्टीही आधीच झालेली आहे. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मात्र सकाळी जाताना त्यांची प्रकृती स्थिर होती, अशी माहिती सिग्मा रुग्णालयाचे डॉक्टर टाकळकर यांनी दिली. मुंबईतील कार्डिओलॉजिस्टची टीम आता पुढे शिरसाट यांच्यावर उपचार करेल, असंही त्यांनी म्हटलंय.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.