आयोगाचं अस्त्र, शिंदे गटाचा सर्वात मोठा वार, संजय राऊतांना अपात्र ठरवण्याचे प्रयत्न, राज्यात घडामोडींना वेग

27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. यावेळी शिंदे गटाच्या अर्थात शिवसेनेच्या प्रतोदांमार्फत व्हिप जारी केला जाऊ शकतो.

आयोगाचं अस्त्र, शिंदे गटाचा सर्वात मोठा वार, संजय राऊतांना अपात्र ठरवण्याचे प्रयत्न, राज्यात घडामोडींना वेग
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 1:55 PM

मुंबईः निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष आणि नावाचं मोठं अस्त्र दिल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. एकिकडे ठाकरे गटाने आरपारची लढाई लढण्याचा चंग बांधलाय. तर निवडणूक आयोगानं दिलेलं आयुध घेत शिंदे गट एक-एक पाऊल पुढे टाकतोय. आज विधीमंडळातील शिवसेना पक्षावर शिंदे गटातील आमादारांनी ताबा घेतला. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाच्या वतीने सर्वच आमदारांना व्हीप बजावला जाईल. तो आदेश जे पाळणार नाहीत, त्या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या खासदार संजय राऊत यांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना अपशब्द वापरले. यानंतर त्यांच्यावर गुन्हादेखील झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ संजय राऊत पागल आदमी है. त्यांच्या बाबत वारंवार विचारू नका. आठ दिवस थांबा संजय राऊत यांना उत्तर देऊ. कुत्रं पिसाळल्यावर त्याला काय चावायचं असतं का? त्याला कोणतं तरी औषध दिलं जातं. थोडं थांबा. राऊतांवर बोलून आम्ही चिखल उडवून घेणार नाही..

संजय राऊतांनी जे दोन हजार कोटींचे आरोप लावले आहेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.सायको माणसाला उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला आयोगाची मान्यता आहे. त्यामुळे त्यांचं डिस्क्वॉलिफिकेशन कसं होईल हे आम्ही पाहणार आहोत. ती कारवाई झाली पाहिजे. त्यांची मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले आहे. त्यांच्यासारखी भाषा आम्हाला वापरता येते. पण ती आम्ही वापरणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.

आमदार-खासदार अपात्र कसे ठरणार?

27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. यावेळी शिंदे गटाच्या अर्थात शिवसेनेच्या प्रतोदांमार्फत व्हिप जारी केला जाऊ शकतो. हा व्हीप न पाळणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. १४ फेब्रुवारी ते १२ मार्च असा विश्रांतीचा काळ आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नव्या शिवसेनेकडून खासदारांना व्हिप जारी केला जाऊ शकतो. तो न पाळल्यास राज्यसभेतील संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई तसेच लोकसभेतील खासदार संजय जाधव, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आदी खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

शिवसेना भवनही ताब्यात घेणार?

शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेलं शिवसेना भवनही ताब्यात घेतलं जाणार का, यावरून शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र संजय शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. ते ट्रस्टचं आहे. त्यामुळे आम्ही त्यावर दावा सांगणार नाहीत. शिवसेना भवनसमोरून जाताना आमचे हात आपसूकच जोडले जातात. तसेच शिवसेनेच्या राज्यभरातील शाखा या पक्षाच्या नाहीत. शिंदे गटातील ज्या आमदारांनी शाखा उघडल्या आहेत, त्या आमच्याच आहेत, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.