संजय राऊतांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, कुठून येतो का कॉन्फिडन्स? शिंदे गटाच्या नेत्याने डिवचलं…

संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढवण्यासंबंधी वक्तव्य केलं.

संजय राऊतांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी, कुठून येतो का कॉन्फिडन्स? शिंदे गटाच्या नेत्याने डिवचलं...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 2:50 PM

गिरीश गायकवाड, मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जम्मू-काश्मीरच काय तर अमेरिकेच्या (America) राष्ट्रपती पदाची निवडणुकही लढवावी.. देशात सगळीकडे डिपॉझिट जप्त झालेलं असताना यांच्यात कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो, असा शेलक्या शब्दात राऊत यांना डिवचलंय. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. येत्या काळात शिवसेना जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी नुकतंच केलं. त्यावरून संजय शिरसाट यांनी त्यांची खिल्ली उडवली.

संजय शिरसाट म्हणाले, ‘ संजय राऊत म्हणतात की, जम्मूत निवडणुक लढवणार.. पण देशात सगळीकडे तर डिपॉझिट जप्त झालंय.. आम्ही त्यांना सांगणार की अमेरीकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणुकही त्यांनी लढवावी.. तिथेही फॉर्म भरावा… कुठून येतो एवढा कांफिडेंस..? हाच प्रश्न पडतो…

धनुष्यबाण आम्हालाच…

शिवसेना आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण यांसंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये असंख्य चुका आहेत. हे त्यामुळे धनुष्यबाण आमचाच होणार आहे. आमचीच ताकद वाढणार.. उद्धव ठाकरे यांना आत्ता हे लक्षात येतंय, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.

सेना भवनात फोटो लावतील..

संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यावरून संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय… ते जम्मूत जाऊन राहूल गांधींना भेटले आहेत.. पण सेना भवनात आत्ता राहूल गांधीला मिठी मारल्याचा फोटो लावतील…

मविआचा पाठिंबा म्हणजे पराभव निश्चित…

नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, यावरूनही शिरसाट यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ शुभांगी पाटील ह्यांना मविआने पाठींबा दिलाय म्हणजेच त्या हरतील आत्ता… कारण जसं राजकारण सुरू आहे त्याहून वाटतंय की त्यांचा पराजय निश्चित आहे, सत्यजित तांबे विजयी होतील…

सरकार कोसळणार?

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या महिनाभरात शिंदे-सरकार कोसळणार असल्याचं भाकित केलंय. त्यावरून शिरसाटांनी त्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, ‘ अमोल मिटकरी हे नवे भविष्य सांगणारे… कदाचित त्यांनी अजित दादांचं वागणं पाहून हे ट्विट केलं असावं.. अजित दादा कुठे जातील.. याचं कदाचित त्यांनी भाकित केलंय…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.