संजय शिरसाट यांचं वादग्रस्त वक्तव्य; सुषमा अंधारे यांच्या तक्रारीची महिला आयोगाने अशी घेतली दखल
राजकारण हा काही माझा पोट भरण्याचा धंदा नाही. ज्यांचा हा धंदा आहे ते नाटकं करायला लागलेत. मी त्यासाठी राजकारण केलं नाही.
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केली. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, दक्षिण मुंबईमध्ये ७२ व्या मजल्यावर कुणासाठी फ्लॅट घेऊन पूजा राखली होती. गुवाहाटीहून आल्यानंतर मिळालेल्या खोक्यांतून पाच खोकी कुणी घेतली होती. तुम्ही संभाजीनगरमधील व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न का करत होता. अटॅक तुमच्या काळ्या गोष्टींमुळे आलेला आहे. यावर, मुंबईत नाही तर रस्त्यावर राहायचं का, असा सवाल शिरसाट यांनी केला. सुषमा अंधारे यांच्यावर केलेलं वक्तव्य आता संजय शिरसाट यांना भोवणार असल्याचं दिसतं. हे प्रकरण आता महिला आयोगाकडे गेलंय.
सुषमा अंधारे यांची तक्रार
पोलिसांकडून संजय शिरसाट यांचे व्हिडीओ महिला आयोगाने मागवले आहेत. यावरून संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य तपासून महिला आयोग पुढचे निर्देश देण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली आहे. आता कारवाईला सुरुवात केली आहे. संजय शिरसाट यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून टीका सुरू आहे.
शिरसाट यांचं वक्तव्य काय?
हे माझे भाऊ आहेत. ते माझे भाऊ आहेत. काय काय लफडी केलीत ते तिलाच ठावूक असं वादग्रस्त व्यक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत घालवली. तू आहे कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता. राजकारणात कधी काहीही घडतं. शिरसाट यांच्या या वक्तव्याने नवा वाद उपस्थित झाला.
तर मला सहन होत नाही
यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, महिला आयोगाच्या चौकशीला नक्कीच सामोरे जाणार. त्यात वावग काय आहे. यापुढं आमच्या चारित्र्यावर बोलायचा प्रयत्न केला तर सडेतोड उत्तर देईन. मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही इतरांचा अपमान कराल तर मला सहन होणार नाही.
राजकारण हा काही माझा पोट भरण्याचा धंदा नाही. ज्यांचा हा धंदा आहे ते नाटकं करायला लागलेत. मी त्यासाठी राजकारण केलं नाही. मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. माझ्या विरोधात कोणी अपशब्द काढला. तर माझ्या कुटुंबाला त्रास होतो. जर कुणी बोललं तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.