Bihar Election Result 2020 | फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा, बिहार भाजपची कृतज्ञता

फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाल्याचं बिहार भाजपचे प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटलं आहे.

Bihar Election Result 2020 | फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा, बिहार भाजपची कृतज्ञता
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:52 PM

पाटणा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असं वक्तव्य बिहार (Bihar) भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केलं आहे. (Sanjay Tiger Give Creadit Devendra fadanvis For Bihar bjp Victory)

“बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसंच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर फडणवीसांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असं संजय टायगर म्हणाले.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. अधिकृतरित्या नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असा दावा फडणवीस यांनी केला होता.

बिहार भाजपच्या या यशाचे श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळत असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

फडणवीसांमुळे बिहारमध्ये भाजपला यश- बावनकुळे

बिहारमध्ये भाजपने मोठं संघटन उभारलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बिहारचं यश फडणवीसांचं देखील- प्रसाद लाड

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस यांचंही यश आणि विजय आहे”, असं आमदार प्रसाद लाड म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांत स्पष्ट होतील. मतमोजणी अजूनही सुरु आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. एवढेच नव्हे तर भाजप आपला मित्रपक्ष असेलेल्या जदयूच्याही पुढे असल्याचं दिसतंय. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, थोडा वेळ वाट पाहा. बिहारमध्ये महागठबंधनलाच स्पष्ट बहुमत मिळणार असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) खासदार मनोज झा यांनी केला आहे.

(Sanjay Tiger Give Creadit Devendra fadanvis For Bihar bjp Victory)

संबंधित बातम्या :

Bihar election results 2020: ‘अनेक जागांवर 500 -1000 मतांचाच फरक, निवडणुकीचे चित्र पुन्हा पालटू शकते’

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकांतील यश आणि विजय फडणवीसांमुळे, निकालापूर्वीच प्रसाद लाड यांच्याकडून श्रेय

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.