ठाकरे सरकारची धक्क्यांची मालिका सुरुच, फडणवीसांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द
भाजपाचे मुंबईतील नेते आणि देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay Mhada) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना धक्के देण्याची मालिका सुरुच आहे. भाजपाचे मुंबईतील नेते आणि देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay Mhada vice president) यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. उपाध्यय हे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. आता त्यांची नियुक्त रद्द करण्यात आली आहे. (Sanjay Upadhyay Mhada vice president)
उपाध्याय हे मुंबईतील भाजपाचे मोठे नेते असून देवेंद्र फडवणीस आणि दिल्लीतील अनेक भाजपा नेत्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असताना उपाध्याय यांची ‘म्हाडा’वर नियुक्ती करण्यात आली होती. तसंच त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता. मात्र आता ठाकरे सरकारने त्यांनी नियुक्ती रद्द केली आहे.
यापूर्वी ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळातील अनेक निर्णय रद्द किंवा स्थगित केले आहेत. आरे कारशेड, थेट सरपंच निवड, हायपरलूप, बुलेट ट्रेन, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती अशा अनेक निर्णय स्थगित किंवा रद्द केले आहेत.
संबंधित बातम्या
फडणवीसांना धक्का, हायपरलूप प्रकल्प ठाकरे सरकारने गुंडाळला
‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती
ठाकरे सरकारचा फडणवीस समर्थक भाजप आमदाराला दणका
ठाकरे सरकारचा आणखी एक दणका, अॅक्सिस बँकेतील ‘ती’ खाती वळवणार?