नागपूर- स्वयंसेवकांचे प्रांत, स्वभाव वेगळे असताना शैली, कृती वेगळी असली तरी त्यांच्यात देशपूजा ही कृती समान असेल. भारताला सर्वश्रेष्ठ मानून त्यासारख बनण्यासाठी, भारताच्या वैभवासाठी, भारत समजून भारत सारख होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. हे संघाच (Sangh) काम नाही तर सर्वांचे काम आहे. सर्वांनी करावे यासाठी संघ नाव घेऊन हे काम केले जात आहे. ज्यादिवशी सगळे देशावर प्रेम करायला लागतील त्या दिवशी संघ नावाची पट्टी निघून जाईल, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलंय. नागपुरात संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
संघाला नाव रोशन करायचे नाही तर समाज घडवायचा आहे. भारताला आत्त्मनिर्भर बनवायचे असेल तर नक्कल करून होणार नाही.. त्यासाठी भारत बनवावा लागेल. भारत समजावा लागेल, असं मोहन भागवत म्हणाले.
आजच्या युगात आपल्या देशासाठी प्रासंगिक आहे, ते धरून जगभरातील ज्ञान पाहिजे,… ते स्वीकारू भारतीय मूलतत्त्वाच्या आधारावर युगानुकूल भारताचं नवीन रूप घडवण्याचं काम स्वयंमसेवक करत आहे.. समाजला ते करावे लागेल. आपल्या आराध्याला सर्वश्रेष्ठ मानण्याचे काम करावं लागेल. अनेक जातीचा भाषेचा गौरव असणे हे काही पाप नाही, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय.
संघासाठी सर्वात आधी भारताला प्राधान्य आहे. जो व्यक्ती भारतासाठी काम करतो, तो आमचा आहे. भारताच्या मार्गात जो आडवा येतो, तो आमचा नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
हिंदू नेमका कोण आहे, सांगताना मोहन भागवत म्हणाले, भारताची भक्ती करतो, देशाच्या वैविध्यावर विश्वास ठेवणाऱ्या संस्कृतीचं पालन करतो, तो खरा हिंदू आहे. अशा व्यक्तीने कोणतीही भाषा बोलली तरी चालते. कुणाचीही पूजा करो, कोणतेही कपडे घालो, कोणत्याही परंपरेचं पालन करो, कोणत्याही प्रांतात राहणारा किंवा कोणत्याही जातीचा असला तरी तो हिंदूच आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.