तिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर मंत्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

तिकीटवाटपावेळी तिष्ठत ठेवल्याने बंडखोरी केलेल्या शरयू रॉय यांनी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना हरवलं.

तिकीट नाकारल्याचा वचपा, बंडखोर मंत्र्याकडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
Follow us
| Updated on: Dec 24, 2019 | 10:53 AM

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव आला. भाजपने महाराष्ट्रापाठोपाठ आणखी एक राज्य हातातून गमावल्याइतकीच चर्चा होती मुख्यमंत्री रघुवर दास यांना बसलेल्या पराभवाच्या धक्क्याची. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच होम ग्राऊण्डवर पराभवाची धूळ चारणारा दुसरा-तिसरा कोणी नसून भाजपचा माजी मंत्री आहे. तिकीटवाटपावेळी तिष्ठत ठेवल्याने बंडखोरी केलेल्या शरयू रॉय यांनी रघुवर दास यांना (Saryu Roy Beats Jharkhand CM) हरवलं.

शरयू रॉय यांनी जवळपास 15 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत रघुवर दास यांना पराभूत केलं. 1995 पासून सलग पाच वेळा आमदार राहिलेल्या दास यांना शरयू रॉय यांनी जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात हरवलं. 73 हजार 332 मतं मिळवत शरयू रॉय विजयी झाले. दास दुसऱ्या, तर काँग्रेस उमेदवार गौरव वल्लभ तिसऱ्या क्रमांकावर होता.

शरयू रॉय हे शेजारच्याच जमशेदपूर पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते. उमेदवार यादी जाहीर करताना रॉय यांना भाजपने अखेरपर्यंत वेटिंग लिस्टवर ठेवलं होतं. अखेर ‘जमशेदपूर पश्चिम’मधून देवेंद्र सिंह यांना भाजपने तिकीट दिलं आणि रॉय यांचा संयम सुटला.

हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये भाजपचं काय चुकलं?

‘मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा केली होती. त्यांनी मला पायउतार होण्यास सांगितलं असतं, तर मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास तयार होतो. पण त्यांनी अशा प्रकारची वागणूक देऊन माझा अवमान केला’ अशा भावना शरयू रॉय यांनी व्यक्त केल्या.

शरयू रॉय यांनी जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल करत, रॉय यांनी त्यांच्यावर मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपही केला होता.

‘मी यूपीएसोबतही नाही, आणि एनडीए सोबतही नाही. जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे. त्यामुळे सदनात मी स्वतंत्र भूमिका बजावेन. भ्रष्टाचारविरोधात आणि पर्यावरण हक्कांसाठी मी काम करेन’ अशी ग्वाही शरयू रॉय यांनी दिली.

एकीकडे, महाराष्ट्रात तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपली खदखद मांडली आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, सरदार तारासिंह, राज पुरोहित यासारख्या माजी आमदारांनी तिकीट नाकारल्याने झालेली घुसमट कधी ना कधी व्यक्त केली आहे. या नाराजीचा फटका भाजपला महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्ये बसल्याचं दिसत आहे. Saryu Roy Beats Jharkhand CM

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.