उदयनराजेंसाठी आघाडीतले सर्व नेते एकवटले!

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. कराड येथे आज आघाडीची महासभा झाली. या महासभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज […]

उदयनराजेंसाठी आघाडीतले सर्व नेते एकवटले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड येथून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला आज सुरुवात झाली. कराड येथे आज आघाडीची महासभा झाली. या महासभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण तसेच उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजेच प्रीती संगमला भेट दिली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करत उदयनराजे भोसले आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचारचा शुभारंभ केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातीन महत्त्वाचे मुद्दे :

  • देशाच्या राजकारणात संधी आणि यश यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे मला मिळालं, म्हणून निवडणूक प्रचार सभांची सुरवात कराडला यशवंतभूमीत केली – शरद पवार
  • सभेची सुरुवात कोठून करावी अशी चर्चा होती, वेगवेगळी ठिकाणं सुचवली, त्यावेळी माझ्या मनात एकच विचार आला, माझं व्यक्तीमत्त्व देशात पोहोचविण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांमुळे झालं. त्यामुळे  कराड मधूनच प्रचाराची सुरवात केली – शरद पवार
  • मोदींच्या राजवटीत दोन वर्षात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या, अनेक ठिकाणी आज शेतकरी उध्वस्त, पण त्याला सरकारची मदत नाही, मोदी सरकार शेतकरी विरोधी धोरण बदलण्यास तयार नाही – शरद पवार
  • देशातील सर्व संस्था मोदींनी उध्वस्त केल्या – शरद पवार
  • 350 कोटींचं राफेल विमान 1,660 कोटी कशी झाली, शाळेत कधी कागदाचे विमानंही न उडवणारे अनिल अंबानी राफेल बनवणार, काही तरी गडबड नक्कीच आहे – शरद पवार
  • “खाऊंगा न खाणे दुंगा” हे खोटे आहे, खाल्ले हे नक्की – शरद पवार
  • यशवंतरांवांनी देशाला संरक्षणासाठी सक्षम बनवलं, इंदिरा गांधींनी शेजारील देशाचा हतिहास नव्हे, भुगोल बदलला – शरद पवार
  • हवाई दलाचा अभिमान आहे, मात्र मोदींनी 56 इंचांची छाती कुलभुषण जाधवला सोडवुन आणण्यासाठी दाखवावी – शरद पवार
  • फसवेगिरी हे आचच्या राज्यकर्त्याचे वैशिष्ट्य – शरद पवार

साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाषणातीन महत्त्वाचे मुद्दे :

  • भाजपला जनतेचा विसर, जनतेवर अन्यायकारक निर्णय लादले, भाजपला मतदान करुन काय मिळवले – उदयनराजे भोसले
  • मेक इंडिया नाही तर ब्रेक इंडिया, लोकशाहीत जनता राजे – उदयनराजे भोसले
  • मीडिया लोकशाहीतील चौथा स्थंभ, मीडियाने लोकांचे हित जपावे, अन्यथा देश देशोधडीला लागेल, टीआरपीसाठी काहीही करु नका, मीडियाची मोठी जबाबदारी – उदयनराजे भोसले
  • “एक बार मैंने कमीटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता” – उदयनराजे भोसले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणातील महत्त्वाते मुद्दे :

  • उदयनराजेंना गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक विक्रमी मतांनी विजयी करा – पृथ्वीराज चव्हाण
  • 2019 च्या निवडणुकीतनंतर नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान नसणार – पृथ्वीराज चव्हाण
  • नरेंद्र मोदी हुकुमशाह, मोदींनी फक्त आठ्ठावीस टक्के अश्वासनं पूर्ण केली, नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासनं दिली होती, पण ती पूर्ण झाली का? – पृथ्वीराज चव्हाण
  • भाजपला उमेदवार मिळत नाहीत, म्हणून साम, दंड, भेद नितीचा वापर भाजप करतात, रोज कुणाला तरी भिती दाखवून पक्षात घेतात – पृथ्वीराज चव्हाण
  • रोज एक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस फोडण्याचं काम सुरु – पृथ्वीराज चव्हाण
  • राफेल जगातील महा घोटाळा – पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.