कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, प्रचाराची रणधुमाळी संपली, मंगळवारी मतदान

कृष्णा कारखान्याची निवडणुक तिरंगी होत आहे. या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी 29 जूनला मतदान पार पडणार आहे. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election voting will be held on tomorrow)

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक, प्रचाराची रणधुमाळी संपली, मंगळवारी मतदान
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 9:41 AM

कराड : कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. कृष्णा कारखान्याची निवडणुक तिरंगी होत आहे. या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी 29 जूनला मतदान पार पडणार आहे. सातारा, सांगली जिल्ह्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र असून 48 हजाराहून अधिक सभासद आपला मतदानाचा हक्क बजावतील. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election campaigning end voting will be held on tomorrow)

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलची प्रचार सांगता सभा संपन्न झाली. यापुढे कृष्णा’ साखरेचा ब्रँड देशभर नेण्यासाठी सहकार पॅनेल काम करेल, अशी ग्वाही यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काय म्हणाले?

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 2015 साली कृष्णा कारखान्यात सत्तेवर आल्यानंतर, आम्ही अनेक अडचणीतून मार्ग काढला होता. या पॅनलने कृष्णा कारखान्याला आणि कारखान्याच्या सभासदांना पुन्हा वैभवाचे दिवस आणले आहेत. सभासदांना वर्षाला मोफत साठ किलो साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशातील एकमेव साखर कारखाना आहे, असे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले.

यापुढेही साखर घरपोच देणार असून येत्या काळात आपल्या कृष्णा कारखान्याच्या साखरेचा ब्रँड देशभर पोहचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सभासदांनी आपले पाठबळ भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे करावे आणि सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कुणाविरोधात कोण लढतंय?

दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांनी अर्जही दाखल केला आहे.

तिरंगी लढत कशी होणार?

डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचे आव्हान असेल.

48 हजाराहून अधिक सभासद मतदानाचा हक्क बजावणार

या निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. कृष्णा कारखान्याची निवडणूक तिरंगी होत असून उद्या 29 जूनला यासाठी मतदान होत आहे. सातारा सांगली जिल्ह्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र असून जवळपास 48 हजाराहून अधिक सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक महत्त्वाची का?

कराडचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हापश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्यक्षेत्र सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात आहे. 47 हजार 700 एवढी सभासद संख्या आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जूनला निवडणूक होते आहे. तर निकाल हा 1 जुलै रोजी लागेल.

कारखाना मोठा आणि सभासद संख्याही मोठी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर ह्या निकालाचे परिणाम होणार हे निश्चित. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. (Satara Karad Yashwantrao Mohite Krishna Sugar Mill Election campaigning end voting will be held on tomorrow)

संबंधित बातम्या : 

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.