तुझ्यात (..) दम नसेल तर मला सांग, नरेंद्र पाटलांची जीभ घसरली

सातारा : साताऱ्यात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरेगावात सभा झाली. या सभेत युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. “शिवसेनेचं वार जसजसे वाढत जाईल, शिवसैनिक पेटत जाईल, तसतसे धमकीचे फोन येतील. पण घाबरायचं नाही, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवा. तोडीस तोड […]

तुझ्यात (..) दम नसेल तर मला सांग, नरेंद्र पाटलांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सातारा : साताऱ्यात महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरेगावात सभा झाली. या सभेत युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. “शिवसेनेचं वार जसजसे वाढत जाईल, शिवसैनिक पेटत जाईल, तसतसे धमकीचे फोन येतील. पण घाबरायचं नाही, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन ठेवा. तोडीस तोड उत्तर द्या. धमकी देणाऱ्याला सांगा तुझ्या…. दम नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तिकडे येतो”, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

उदयनराजे हे जिल्ह्यातील ‘डिफरंट कॅरेक्टर’ आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की खामोश असे उत्तर मिळतं, असं नरेंद्र पाटील म्हणाले. त्यापुढे जाऊन नरेंद्र पाटील यांनी स्टेजवरुन थेट शिवी हासडत उदयनराजेंना एकप्रकारे धमकी दिली.

माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ले झालेत. मला आता मरणाची भिती नाही. धमकीला घाबरायचं नाय. तुमच्या हातात मोबाईल आहे. तुम्ही मर्द मराठे आहेत. तुझ्या ( ……….) दम नसेल तर मला सांग मी तिकडे येतो, असा एकेरी उल्लेख करत, नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंचं नाव न घेता थेट आव्हान दिलं.

या सभेत युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर विकासनिधीच्या गणितावरुन टीका केली. खासदारांना विकासावर बोलता येत नाही. टीव्ही चॅनेलवर 17 हजार कोटीचा विकासनिधी होता. मात्र कराड येथील पत्रकार परिषदेत तो निधी 18 हजार कोटीवर गेला. चार दिवसात परिवर्तन असं झालं की हजार कोटी कसे वाढले हेच समजले नाही, असा निशाणा नरेंद्र पाटील यांनी साधला.

वाचा :  अब्जाधीश…. छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती? 

विकास कामं पंतप्रधान मोदींनी आणि आमच्या मंत्र्यांनी आणली. कोण कोणाच्या पोराला आपलं म्हणतंय. पोरगं कोणाचं, बाप कोणाचा, तुम्ही दुसऱ्याच्या पोराला आपलं नाव का देताय, अशी खरमरीत टीका युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.

नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसलेंवर त्यांच्या दहशतीवरुन कडाडून टीका केली.

नरेंद्र पाटील विरुद्ध उदयनराजे भोसले

साताऱ्यात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेत दाखल झालेले नरेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निकालावेळी समजेल

सातारा लोकसभा मतदारसंघाचा  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. त्यानुसार 23 एप्रिलला साताऱ्यासह महाराष्ट्रात एकूण 14 मतदारसंघांसाठी मतदान होईल. या मतदारसंघांमध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या 

राजकारणापलिकडचे राजे! नरेंद्र पाटलांच्या आईला भेटण्यासाठी उदयनराजे हॉस्पिटलमध्ये! 

उदयनराजेंना हरवण्यासाठी हातात खडू घ्या, भिंतीवर धनुष्यबाण काढा : चंद्रकांत पाटील  

उदयनराजेंचं मातृप्रेम! आईचे पाय भाजू नये म्हणून स्वत: चप्पल दिली! 

राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा, निवडणूक आयोगाची पंचाईत  

हसू नका, शिट्या वाजवायला काय झालं, उदयनराजेंनी झापलं, नमाजाला भाषण रोखलं  

न्यूजरुम स्ट्राईक : उदयनराजे भोसले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा  

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.