….मग पवार शिक्षण संस्था नाव द्या की..उदयनराजे का खवळले?
संख्या ज्याची जास्त आहे. त्याचा पक्ष.. ते इथं पण लागू करा. ज्या कुटुंबाची संख्या जास्त... पवार कुटुंबाची आहे... मग पवार शिक्षण संस्था नाव देऊन टाका...असं वक्तव्य रयत शिक्षण संस्थेतील कारभारवर बोलताना खा. उदयनराजेंनी केलंय
साताराः रयत शिक्षण संस्थेच्या कारभारावरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) चांगलेच भडकले आहेत. रयत शिक्षण संस्था ही सामान्य लोकांची आहे. मात्र संस्थेवर सर्वाधिक पवार (Pawar) कुटुंबातलेच लोक असतील तर तिचं नावच बदलून टाका… पवार शिक्षण संस्था असं करा… असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. या शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) असावा, असं ठरलंय, मग यांनी अचानक असा का बदल केला, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.
आज सोमवारी रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर एक आंदोलन झालं. त्यावर माध्यमांनी उदयनराजेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले ही जागा कर्मवीर अण्णांनी दिली तेव्हा मी हाफ चड्डीत होतो. आज रयत शिक्षण संस्थेची जागा आहे…
चेअरमन किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षाचे सरकार असो.. तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा, हे ठरलंय. मग असं काय घडलं की त्यांनी एकदम बदल केला.? बदल करणारे हे कोण? लोकांना सवयच लागलीय. हे माझं. तुझं माझं. सगळं माझं.. पण किती? असा सवाल उदयन राजे भोसलेंनी विचारला.
ज्या लोकांचं काही योगदान नाही. तुम्ही त्यांना घेतलं नाही. हे घेणारे कोण? आम्ही दिलंय. यांनी काय दिलंय? यांनी फक्त ओढलंय… एवढं सगळं केलंय तर मग रयतचं नाव बदलून टाका.
संख्या ज्याची जास्त आहे. त्याचा पक्ष.. ते इथं पण लागू करा. ज्या कुटुंबाची संख्या जास्त… पवार कुटुंबाची आहे… मग पवार शिक्षण संस्था नाव देऊन टाका…आज इथल्या लोकांच्या वेदना तुम्ही ऐकून घेणार आहात का? असा सवाल खा. उदयनराजेंनी केलाय.