सातारा : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर तारीख पे तारीख देण्याचं काम सुरू आहे. एकीकंड सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढं ढकलली. त्यामुळं दुसरीकडं राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही पुढं ढकलला जात असल्याचं समजतं. यासंदर्भात माजी मंत्री सतेज पाटील ( Satej Patil) म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जी खाती मागतायत ती भाजपाला ( BJP) द्यायची नाहीत. म्हणूनच काँग्रेस किंवा इतर पक्षातील फुटणार आहेत असं सांगितलं जातं. एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याची शक्यता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी साताऱ्यात बोलून दाखवली आहे. दोघांच्या अंतर्गत वादातून या पक्ष प्रवेशाच्या अफवा पसरवल्या जातायत असं सतेज पाटील म्हणालेत.
मंत्रिमंडळ आणण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. एकीकडे अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पाऊस नाही, असं दोघांकडून सरकार चालवणे योग्य नाही. सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. त्यात कोर्ट काय निर्णय देते आहे त्याची काळजी असावी. कोणाला खाती कोणती द्यायची याचा वाद असू शकतो. शिंदे गटात पहिले आलेले 20 यांना मंत्री पदे यायची की नंतर आलेल्या 20 जणांना यावर देखील वाद सुरू असू शकतो. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसात मंत्रिमंडळ जाहीर करू असं म्हंटलं. पण, आज त्यांची प्रकृती बरी नव्हती. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. त्यांनी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारावर तारीख पे तारीख सुरू आहे, असंच म्हणावं लागेल.