सतेज पाटील : आमचं ठरलंयपासून, करुन दाखवण्यापर्यंत, आसगावकरांच्या विजयाचे हिरो
गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी जयंत आसगावकर यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कोल्हापूर : निवडणूक कोणतीही असो कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patils role in Jayant Asgaonkars victory) यांनी ठरवलं की ते करुन दाखवतात असंच काहीसं समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात तयार झालं आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तांतरापर्यंत याचा प्रत्यय आला आहे. इतकंच नाही तर पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निकालानंतरही (Pune result) ते पुन्हा अधोरेखित झालं. (Satej Patils important role in Jayant Asgaonkars victory)
पदवीधर आणि आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Pune teachers constituency election) जाहीर झाल्यानंतर पुणे मतदारसंघातून शिक्षक किंवा पदवीधरपैकी एक उमेदवारी काँग्रेसला घ्या, दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असा विश्वास त्यांनी कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांना जाहीर सभेत दिला होता. त्यानंतर एक महिन्यानंतर शिक्षक मतदार संघातून प्रा.जयंत आसगावकर यांना विजयी करत ही जबाबदारी सतेज पाटील यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
ट्रॅक्टर मोर्चादरम्यान विजयाची हमी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रातील पहिला ट्रॅक्टर मोर्चा 5 नोव्हेंबरला सतेज पाटील यांच्या आयोजनातून काँग्रेसनं काढला. या मोर्चासाठी काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते. यावेळी भाषणादरम्यान पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी शिक्षक किंवा पदवीधर पैकी एक जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली.
अर्धी लढाई तेव्हाच जिंकली
सतेज पाटील यांच्या मागणीप्रमाणे ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाली. सतेज पाटील यांनी काँग्रेसच्याच जयंत आसगावकर यांना उमेदवारी मिळवून देत, अर्धी लढाई जिंकली. यानंतर मात्र आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रचार काळात पाचही जिल्ह्यात अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरले. आजअखेर त्यांच्या या धडपडीला यश तर आलंच, पण दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घेऊ शकतो याची झलकही त्यांनी दाखवली.
सकाळी सातपासून प्रचारात
उमेदवार निश्चित झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील चांगलीच कंबर कसली. ही जागा कोणत्याही परिस्थिती निवडून आणणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं बनलं होतं. त्यासाठी न थकता बैठका, प्रचारसभा त्यांनी पूर्ण केल्या. इतकंच नाही तर प्रत्यक्ष मतदानादिवशी सुद्धा सकाळी सात वाजल्यापासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेत होते. सतेज पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरले होते. त्यामुळेच महाविकास आघाडीने घासून नाही तर ठासून विजय मिळवला, असं त्यांचे नेते सांगतात.
महत्त्वाचे निकाल
- पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) विजयी – पराभूत संग्राम देशमुख (भाजप)
- पुणे शिक्षक – जयंत आसगावकर, काँग्रेस, विजयी – पराभूत , दत्तात्रय सावंत (अपक्ष – भाजप पाठिंबा)
- नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – विजयी – पराभूत संदीप जोशी ( भाजप)
- औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी – पराभूत शिरीष बोराळकर (भाजप)
- अमरावती शिक्षक – अपक्ष उमेदवार किरण सरनाईक – विजयी, पराभूत श्रीकांत देशपांडे – शिवसेना
हा विजय सर्व शिक्षक मतदार व महाविकासआघाडीचा.
पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी केल्याबद्दल सर्व शिक्षक मतदारांचे मनापासून आभार. महाविकासआघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच “कोल्हापूरला” हा बहुमान मिळाला आहे. pic.twitter.com/a4U2zpJ01T
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) December 4, 2020
(Satej Patils important role in Jayant Asgaonkars victory)
संबंधित बातम्या