Sattvasheela Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?" असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. (Sattvasheela Prithviraj Chavan detained )

Sattvasheela Prithviraj Chavan | पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 1:45 PM

कराड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतलं. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई केली. (Sattvasheela Prithviraj Chavan detained by Police in Karad Chakkajam Protest for Delhi farmers agitation)

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या

साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या निषेध नोंदवला.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाजवळ कोरेगाव-सातारा मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी या महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या थापल्या. त्यानंतर काही वेळासाठी याठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

पुण्यातही आंदोलन

पुणे-नाशिक महामार्गावर मोशी इथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी चक्का जाम आंदोलन केलं. दुपारी साडे बाराच्या सुमाराला हे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या आणि पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. (Sattvasheela Prithviraj Chavan detained by Police in Karad Chakkajam Protest for Delhi farmers agitation)

पुणे – सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी संघटनासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी या आंदोलकांनी केली.

सांगलीत रास्तारोको

केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द करा, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. मिरज – पंढरपूर हायवेवर तासगाव फाट्याजवळ रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या :

शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण

(Sattvasheela Prithviraj Chavan detained by Police in Karad Chakkajam Protest for Delhi farmers agitation)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.