‘हर्षवर्धन पाटील संधीसाधू’, सत्यजीत तांबेंची टीका, लेक अंकिता पाटलांचं तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची लेक तथा पुणे जि.प. सदस्य अंकिता पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'हर्षवर्धन पाटील संधीसाधू', सत्यजीत तांबेंची टीका, लेक अंकिता पाटलांचं तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 8:20 AM

इंदापूर :  युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांच्यावर इंदापुरात येऊन टीका केली. हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याचा घणाघात तांबेंनी केली. तांबेंच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Satyajeet Tambe Criticized Harshawardhan patil, Ankita Patil Reply Tambe)

“सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत”, अशा शब्दात शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

“युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती”, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केलाय.

“राज्यातील ज्येष्ठ नेत्यावर बोलताना काही सुसंस्कृतपणाचे संकेत असतात ते त्यांनी पाळायला हवे होते. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. शेवटी मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं”, असा टोला सरतेशेवटी अंकिता यांनी लगावला.

सत्यजीत तांबे हर्षवर्धन पाटलांवर टीका करताना काय म्हटले…?

युवक काँग्रेसचा इंदापुरात मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रमुख वक्ता म्हणून संबोधित करताना सत्यजीत तांबे यांनी पाटील यांच्यावर राजकीय टोलेबाजी करत टोले लगावले.

“इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे नाव आजही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेता आदराने घेतो. पुणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांत तो विचार राहिला नाही किंबहुना संधीसाधूपणा आला. खरं तर शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला”, अशी टीका सत्यजीत तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली होती.

कोण आहेत अंकिता पाटील

अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. विधानसभेला तिकीट वाटपावरुन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र अंकिता आजही काँग्रेसमध्येच आहेत.

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या  संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. (Satyajeet Tambe Criticized Harshawardhan patil, Ankita Patil Reply Tambe)

हे ही वाचा

हर्षवर्धन पाटील भाजपात, मुलगी मात्र काँग्रेसमध्येच

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....