तातडीने महापरीक्षा पोर्टल बंद करावं, अन्यथा धडक मोर्चा : सत्यजीत तांबे

सरकारने तातडीने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

तातडीने महापरीक्षा पोर्टल बंद करावं, अन्यथा धडक मोर्चा : सत्यजीत तांबे
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 9:06 PM

मुंबई : सरकारने महापरीक्षा पोर्टल स्थगित केले असले, तरी रद्द करण्याविषयी अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने तातडीने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याविषयी घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे (Satyajeet Tambe on Mahapariksha portal). तसेच या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशीही मागणी सत्यजीत तांबे यांनी केली. ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत बोलत होते.

सत्यजीत तांबे यांनी या मागण्यासंबंधी सरकारला 1 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या अगोदर सरकारकडून कार्यवाही न झाल्यास विधानसभेवर धडक मोर्चा नेण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी यावेळी उपस्थितांना सीएए, एनआरसी आणि भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणाबद्दल माहिती दिली. तसेच भाजपवर सडकून टीका केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून सरकारचे काम त्याच्यापर्यंत पोहोचवावं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

महिलांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये बरोबरीचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवर ठोस निर्णय घेतले जाणार असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. हरपाल सिंह यांनी युवक काँग्रेसचं काम महाराष्ट्रात चांगलं चालल्याचं नमूद करून नाशिक, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांचा विशेष उल्लेख केला. दरम्यान, प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राबवण्यात येत असलेले युवा जोडो अभियान (सुपर 1000) आणि राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टर तथा NRU च्या मोहीमेची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेससाठी तडफदार प्रवक्ते शोधण्यासाठीच्या ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसिद्धीपत्रकाचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि महाराष्ट्राचे प्रभारी हरपाल सिंह यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satyajeet Tambe on Mahapariksha portal

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.