Video | सत्यजित तांबे यांचं सभागृहात पहिलंच भाषण, म्हणाले… याचं श्रेय फडणवीसांचं! नेमके मुद्दे काय?

Satyajeet Tambe News | विधान परिषदेत आज नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचं पहिलं भाषण झालं. अत्यंत नाट्यमय निवडणुकीनंतर सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदार संघात विजय झाला. त्यामुळे त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं.

Video | सत्यजित तांबे यांचं सभागृहात पहिलंच भाषण, म्हणाले... याचं श्रेय फडणवीसांचं! नेमके मुद्दे काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 3:26 PM

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात नव निर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी प्रथमच हजेरी लावली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी सभागृहात आज पहिलं भाषण केलं. एरवी फार गाजावाजा न होणारी पदवीधरची निवडणूक यंदा गाजली ती सत्यजित तांबे यांच्यामुळे. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदान आणि निकाल लागेपर्यंतही महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे कधी भाजपात जातील आणि काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र असं काही घडलं नाही आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि ते निवडून आले. आज विधान परिषदेत बोलताना त्यांनी या राजकीय नाट्याचा धावता उल्लेख केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आवर्जून घेतलं.

काय म्हणाले सत्यजित तांबे?

सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेची निवडणूक आपण कशी लढवली आणि इथपर्यंत कसे आलो, याचा उल्लेख भाषणादरम्यान केला. ते म्हणाले, माझी संपूर्ण निवडणूक कशी झाली, ते तुम्ही पाहिलं. माझ्या यशाचं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाचं आहे. पण हे सर्व घडत असताना मला निवडणूक लढण्याची परिस्थिती निर्माण झाली, त्याचं श्रेय देवेंद्रजींना आहे. राजकीय जीवनात मी एक वाक्य कायम लक्षात ठेवतो. वारसाने संधी मिळते, पण कर्तृत्व कायम सिद्ध करावं लागतं…

सत्यजित तांबे यांच्या भाषणातील मुद्दे

  • – विधान परिषद आणि विधानसभेचं लाइव्ह प्रक्षेपण सर्वत्र दिसत असतं. जनतेच्याही याकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित होऊ न देण्याचा प्रयत्न केला जावा, अशी विनंती सत्यजित तांबे यांनी भाषणादरम्यान केली.
  •  राज्यपालांनी अभिभाषणात ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय जाहीर केला. मात्र ती नोकरभरती, कुठे, कधी, कशी होणार याचा उल्लेख नव्हता. असं तांबे यांनी सांगितलं.
  •  अनेक सुशिक्षित तरुणांना परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नाही. नियुक्ती मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. परवा हायकोर्टाने परीक्षा घेतलेल्या १४०० विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी मला भेटले.
  •  जलसंपदा विभागातही अनेक जागा रिक्त आहेत. मतदार संघात फिरताना शिक्षण अवस्था वाइट आहे. शिक्षक, इतर कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य, शिपायांची भरती रखडलेली आहे. २ लाखांपेक्षा जास्त आज रिक्त आहेत. ७५ हजारांच्या भरतीने किती न्याय मिळणार, असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी केली.
  •  मध्य प्रदेशने वयाच्या अटीत ३ वर्षांची शिथिलता आणली. इतर राज्यांनीही अशी शिथिलता आणली. महाराष्ट्रातही अशी व्यवस्था करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली.
  •  जुन्या पेंशन योजनेमुळे हिमाचलचे निकाल बदलले. यामुळे आर्थिक भार पडेल. पण कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने याचा विचार करावा.
  •  दावोसमध्ये झालेले एमओयू होत असताना कंपन्या येतात. फोटोसेशन होतात. पण प्रत्यक्षात किती उद्योगधंदे येतात, हा संशोधनाचा विषय आहे.
  •  आपला दवाखाना सारखे नवे प्रकल्प येत आहेत. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या दवाखान्यात सुविधा आहेत का, याकडे लक्ष द्यावं.
  •  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारचं विशेष अभिनंदन करतो. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतो. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होणार आहे.
  •  दिव्यांग विभाग काढल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.
  •  नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख अभिभाषणात केला गेला. मात्र त्यासाठीची तयारी अद्याप शासनस्तरावर झालेली नाही. आझाद मैदानावर अनेक संघटना आंदोलनं करतात. त्यांच्याकडे शासनाचं लक्ष असावं, अशी विनंती सत्यजित तांबे यांनी केली.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.