Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : सिंधीया काँग्रेसमधून भाजपात, तरीही ग्वालीयरमध्ये भाजपचा पराभव, 50 वर्षांनंतर काँग्रेसचा महापौर

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवाराचा माहौल दाखविण्याचा प्रयत्न केला.

Congress : सिंधीया काँग्रेसमधून भाजपात, तरीही ग्वालीयरमध्ये भाजपचा पराभव, 50 वर्षांनंतर काँग्रेसचा महापौर
सिंधीया काँग्रेसमधून भाजपात, तरीही ग्वालीयरमध्ये भाजपचा पराभव
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 10:17 PM

ग्वालीयर : ग्वालीयर नगरपालिका निवडणुकीत 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसचा महापौर होतोय. भाजपचा महापौर पदासाठी पराभव झाला. ग्वालीयरमध्ये काँग्रेसचा महापौर दिसणार आहे. भाजपला मूळ काँग्रेसींनी पराभूत केले नाही. शोभा सिकरवार आणि त्याचे पती डॉ. सतीश सिकरवार (Satish Sikarwar) यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार सुमन शर्मा यांचा चेहरा संघटनेत ओळखीचा होता. पण, मतदारांमध्ये फारसा प्रभाव पाडू शकल्या नाही. सतीश सिकरवार यांचं राजकारण (Politics) हे लोकसेवेवर आधारित होते. त्यामुळं मतदारांनी सतीश सिकरवार यांच्याकडं पाहून मतदान केलं. त्यामुळं भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया (Jyotiraditya Scindia) काँग्रेसमधून भाजपात आले. पण, तरीही काँग्रेसने ग्वालीयरमध्ये बाजी मारली.

सिंधीयांचा करिश्मा चालला नाही

1956 साली ग्वालीयर महापालिका तयार झाली. 1956 ते 1973 पर्यंत नगरसेवक महापौर निवडत होते. कार्यकाळ एका वर्षाचा राहत होता. 1973 ते 1983 पर्यंत प्रशासनिक व्यवस्था होती. 1983 ते 1987 पर्यंत नगरसेवकांनीच महापौरांची निवड केली. 1995 पासून मतदार महापौरांची निवड करत होती. भाजपच्या महापौर अरुणा सैन्या झाल्या. तेव्हापासून महापौर पदावर भाजपचाच कब्जा होता. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया काँग्रेस सोडून भाजपात आले. तरीही भाजप ग्वालीयरमध्ये आपला महापौर निवडून आणू शकली नाही.

सुरुवातीपासून काँग्रेसच्या उमेदवार पुढं

महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत पोस्टाच्या मतात भाजपचा उमेदवार मागे होता. पहिल्या राऊंडपासून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा सिकरवार यांना जास्त मत मिळत गेली. भाजपच्या उमेदवार सुमन शर्मा मागे होत्या. कोणत्याही राऊंडमध्ये भाजपच्या उमेदवार पुढं नव्हत्या. याचा अर्थ काँग्रेसला सर्व प्रकारच्या मतदारांनी निवडून दिलं.

हे सुद्धा वाचा

शिवराज, सिंधीया यांनी केला होता प्रचार

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तीन विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या होत्या. ग्वालीयर विधानसभा क्षेत्रात रोड शो केला होता. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवाराचा माहौल दाखविण्याचा प्रयत्न केला. ग्वालियर पूर्व आणि दक्षिण विधानसभा क्षेत्रात केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठक घेतली होती.