पाटना: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. एकूण 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवारासाठी हे मतदान होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) यांच्यात लढत होत आहे. (Voting for the second phase of Bihar Assembly elections begins)
Bihar Election 2020 Live Updates
[svt-event title=”बिहारमध्ये सकाळी दहापर्यंत केवळ 8 टक्के मतदान” date=”03/11/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात सकाळी 10 वा. पर्यंत 8.14 टक्के मतदान, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने [/svt-event]
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 143 महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 2 कोटी 85 लाख 50 हजार 285 मतदार आपला हक्क बजावतील. यात 1 कोटी 35 लाख 16 हजार 271 महिला तर 980 ट्रान्सजेंडर मतदार आहेत.
‘बदलाच्या या सुनामीमध्ये बिहार शिक्षण, उत्पन्न, आरोग्य, सिंचन आणि महागाई या अजेंड्यावर मतदान करेल. मला विश्वास आहे की लोकांना बदल हवा आहे. बिहारची जनता बदल घडवण्यासाठी मतदान करेल. पहिल्या टप्प्यातील मतदानापासून हे स्पष्ट झालं आहे’, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी ठीक मतदान सुरु होण्यापूर्वी दिली आहे.
दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राघोपूर मतदारसंघातील 24 नंबरच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. बिहारमध्ये चिराग पासवान यांनी NDA तून बाहेर पडत दंड थोपटल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राजेंद्रनगरच्या सेंट जोसेफ हायस्कुलमधील मतदारसंघात मतदान केलं. त्यावेळी लोकांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अशी विनंतीही मोदी यांनी नागरिकांना केली आहे.
I appeal to the people to step out of their homes, cast their vote, maintain social distancing and keep wearing mask: Deputy Chief Minister Sushil Kumar Modi after casting his vote at polling booth no.49 at St Joseph High School in Rajendra Nagar, Patna #BiharElections pic.twitter.com/iTon66FQsO
— ANI (@ANI) November 3, 2020
बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी सकाळच्या सत्रात पाटन्यातील दिघामध्ये मतदानाचा हक्क बजावला. सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. यावेळी राज्यपालांनी नागरिकांना मतदानाचं आवाहनही केलं.
Bihar: Governor Phagu Chauhan cast his vote for 2nd phase of #BiharElections, at the polling booth at government school in Digha, Patna. He says, “I appeal to the people to participate in election in large numbers. I hope that voting percentage will be more than previous time.” pic.twitter.com/6HsmpS4aUj
— ANI (@ANI) November 3, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ 1 तासांनी वाढवली आहे. 94 पैकी 86 मतदारसंघात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. तर उर्वरित 8 मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. यात तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघाचाही समावेश आहे.
लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम
Voting for the second phase of Bihar Assembly elections begins