बच्चू कडू यांच्या मेळाव्याआधीच रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा वेढा; वाद मिटणार की धगधगताच राहणार?

बच्चू कडू आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना या वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केल्याचं सांगितलं जातं.

बच्चू कडू यांच्या मेळाव्याआधीच रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा वेढा; वाद मिटणार की धगधगताच राहणार?
बच्चू कडू यांचा मेळाव्याआधीच रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा वेढा; वाद मिटणार की धगधगताच राहणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 2:15 PM

अमरावती: आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि रवी राणा (ravi rana) यांच्यातील वाद अजूनही सुरूच असल्याचं चित्रं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही नेत्यांची समजूत काढली. त्यानंतर रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधत असताना आपण शब्द मागे घेत असून दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं स्पष्ट केलं. मात्र, बच्चू कडू यांनी मेळावा घेऊनच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे बच्चू कडू यांचा आज हा मेळावा होत असतानाच रवी राणा यांच्या अमरावतीतील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बच्चू कडू यांनी काल मीडियाशी संवाद साधला. यावेळी उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. वाद मिटला असल्याचं बच्चू कडू यांनी थेट म्हटलं नाही.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे अमरावतीत बच्चू कडू यांचा मेळावा आज पार पडत आहे. या मोर्चाला 10 हजारांच्यावर कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे पोस्टर्स लागले आहेत. झुकेगा नही… असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. त्यामुळे शहरात वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे.

या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी अनुचित प्रकार करू नये म्हणून रवी राणा यांच्या घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काल रात्रीच पोलिसांनी रवी राणा यांच्या घराच्याबाहेर तंबू ठोकून मुक्काम ठोकला आहे. यावेळी महिला पोलीसही मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. या पोलिसांना 24 तास सख्त पहारा देण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

घराची सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी रवी राणा हे अमरावतीत नाहीत. ते मुंबईत आहेत. मात्र, खासदार नवनीत राणा या अमरावतीत आहेत. मात्र, राणा यांच्या कुटुंबीयांना काही त्रास होऊ नये म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, बच्चू कडू आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना या वादावर पडदा टाकण्याचं आवाहन केल्याचं सांगितलं जातं.

त्यामुळे या मेळाव्यात रवी राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी न करण्याचं आवाहन देण्यात आलं आहे. मंचावरून या सूचना दिल्या जात आहे. यावरून बच्चू कडू यांनी या वादावर पडदा टाकण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे.

बच्चू कडू आणि राणा दोघेही अमरावतीतील महत्त्वाचे नेते आहेत. दोघांचाही जिल्ह्यात मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. शिवाय दोघेही एकमेकांचे स्पर्धक आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी बच्चू कडू मेळावा घेऊन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.