Shiv sena : अंधेरी पूर्वच्या निवडणूकीसाठी सेनेची लटकेंच्या पत्नींनाच उमेदवारी, भाजपची रणनीती काय राहणार?

रमेश लटके यांचा अंधेरी पूर्वच्या मतदारसंघावर प्रभाव होता. ते दोन वेळेस येथील आमदार राहिले होते. मे महिन्यात ते कुटुंबियांसोबत ते दुबईला निघाले असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. वयाच्या 52 व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुने शाळकरी सैनिक अशी त्यांची ओळख होती.

Shiv sena : अंधेरी पूर्वच्या निवडणूकीसाठी सेनेची लटकेंच्या पत्नींनाच उमेदवारी, भाजपची रणनीती काय राहणार?
अधरी पूर्वच्या पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून स्व. रमेश लटके यांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 2:24 PM

मुंबई : सध्या राज्यात मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा असली तरी, (Shiv Sena) शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरही लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघाचे (Ramesh Lakte) आमदार रमेश लटके यांचे 12 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे (By-election) पोटनिवडणूकीत शिवसेनेकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. मतदारसंघात लटके यांचा राहिलेला प्रभाव आणि त्यानंतरच्या भावनिक लाटेचे रुपांतर मतदानात होईल असा कयास शिवसेनेचा आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप या जागेची निवडणूक लढविणार आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणांमुळे भाजपाचा आत्मिविश्वास वाढली आहे तर दुसरीकडे शिवसेनेला एक आमदाराचेही महत्व असल्याने या पोटनिवडणूकीकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना पदाधिकारी पक्ष प्रमुखांच्या भेटीला

पोटनिवडणूकीच्या अनुशंगाने अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे पदाधिकारी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्या दरम्यान, सर्वांनी एकमुखाने उमेदवारी ही ऋतुजा लटके यांनाच द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली असून ही जागा कायम ठेवण्यासाठी सेनेकडबन प्रयत्न सुरु झाले आहेत.

लटकेंची अशी राहिली कार्यकीर्द

रमेश लटके यांचा अंधेरी पूर्वच्या मतदारसंघावर प्रभाव होता. ते दोन वेळेस येथील आमदार राहिले होते. मे महिन्यात ते कुटुंबियांसोबत ते दुबईला निघाले असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. वयाच्या 52 व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुने शाळकरी सैनिक अशी त्यांची ओळख होती.

आशिष शेलारांच्या नेतृत्वात भाजप रिंगणात

अंधेरी पूर्वची ही पोट निवडणूक असली तरी राज्यातील सध्याचे वातावरण पाहता भाजप काटे की टक्करच्या तयारीत आहे. शिवाय पक्ष नेतृत्वाला दाखवून द्यायचे असल्याने आशिष शेलार हे वर्चस्व पणाला लावणार हे नक्की. पण लटके यांचे योगदान आणि त्यांच्या निधनानंतर तयार झालेली भावनिक लाट याचा सेनेला फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.