मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे सात जण सज्ज
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून (Nagpur south-west constituency) मुख्यमंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate against CM Fadnavis) कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून (Nagpur south-west constituency) मुख्यमंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार (Congress candidate against CM Fadnavis) कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तिकडे काँग्रेस मात्र सगळ्याच मतदार संघात आमच्या पक्षात इच्छुकांची मोठी संख्या असल्याचं सांगतं आहे.
नागपूर शहरात निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन तयार असल्याचं सांगितलं जात आहे. इतर मतदारसंघांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही निवडणूक ताकतीने लढविण्याची काँग्रेसची तयारी आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी सात इच्छुक उमेदवार तयार असल्याची माहिती आहे (seven candidates ready to cast elections against CM).
2009 मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. पश्चिम नागपूर मतदारसंघाचा बराचसा भाग या मतदारसंघात सामील झाला. यंदाच्या विधानसभा निलवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट झालं आहे. गेल्यावेळी काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील हे या मतदारसंघातून उमेदवार होते. याहीवेळी प्रफुल्ल गुडधे पाटील मुख्यमंत्र्यांना आव्हान देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, मुख्यमंत्र्याविरुद्ध लढण्यास गुडधे पाटलांनी नकार दिल्याने काँग्रेससमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्याविरुद्ध काँग्रेस एक दमदार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा गेल्या आठवड्यात होती. परंतु, मतदारसंघात वर्षानुवर्षे कार्य करणारे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, बाहेरचा उमेदवार दिल्यास त्याला परतवून लावू, असा इशारा शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिला. त्यामुळे आता काँग्रेसमोरील पेच आणखी वाढला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कामाची दखल न घेता पक्षश्रेष्ठी बाहेरील उमेदवार लादतात, अशी भावना स्थानिक नेते व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, शहरातील सात उमेदवार या मतदारसंघातून लढण्यास तयार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश सरचिटणी संदेश सिंगलकर सांगतात.
निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या, आचारसंहिताही लागू झाली. मात्र, नागपुरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून काँग्रेसच्या सात स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत, अशी माहिती आहे. मात्र, काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरु असून लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येईल, असं पक्षाचे नेते सांगतात. तर दक्षिण-पश्चिम मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. शिवाय, स्वतः मुख्यमंत्री उमेदवार असल्याने काँग्रेसला बाहेरचाच नाही, तर स्थानिक उमेदवार मिळणे कठीण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे आता काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार, कुणाला उमेदवारी देणार, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
संबंधित बातम्या :
मोदींनी जाती-पातीत न बसणाऱ्या माझ्यासारख्याला मुख्यमंत्री केलं : देवेंद्र फडणवीस
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण?
जामखेडमध्ये रोहित पवारांकडूनही फोडाफोडी, राम शिंदेंना घेरण्याची तयारी?
चंद्रकांत पाटलांकडून 3 मतदारसंघाची चाचपणी, निवडणूक मैदानात उतरण्याची चिन्ह