सिंधुदुर्ग : “व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. वैभववाडी नगरपंचायतीसाठी शिवसेनेला उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती शिवसेनेची आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. त्यांच्या पक्षाची अशी परिस्थिती होऊ नये म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आम्ही 7 नगरेसवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवत आहोत,” असे खरमरीत भाष्य भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून वरील भाष्य केले. (seven corporators is gift to Uddhav Thackeray on occasion of Valentines Day said MLA Nitesh Rane)
“व्हॅलेन्टाईन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर तिथे उमेदवारसुद्धा मिळणार नाही, अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. ते आमच्या हृदयात आहेत. मात्र, वैभववाडीत शिवसेनेची परिस्थिती वाईट आहे. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची प्रमाणिक भावना आहे. म्हणून आमचे 7 नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले.
Dear Uddhavji,
Happy Valentines Day !Love : Nitesh Narayan Rane ? pic.twitter.com/BOEiAnmBMq
— nitesh rane (@NiteshNRane) February 9, 2021
तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आवश्यक असलेली सही दिली, त्याचा मोबदला म्हणूनही हे सात नगरसेवक देत असल्याचे ते म्हणाले. “मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्याला ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आमच्या मेडिकल कॉलेजसाठी त्यांनी सही केली. त्यांना आम्ही काही दिले तर ते घेणार नाहीत. म्हणून त्यांना मी हे सात नगरसेवक पाठवतो आहे,” असे नितेश राणे म्हणाले. तसेच, व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्धवजींना मनापासून शुभेच्छा देतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.
नेमका प्रकार काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 7 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे कोकणात भाजप आणखी मजबूत होईल असे म्हटले जात होते. मात्र, शाह यांचा दौरा संपल्यानंतर वैभववाडी नगरपंचायतीतील भापजचे 7 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. या सातही नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. राणे कुटुंबीयांना शिवसेनेने दिलेली ही मोठी चपराक असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी वरील वक्तव्य केले.
दरम्यान, सात नगरेवक गेल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडणार नसल्याचा दावा भाजपने केला. वैभववाडीत 17 नगरसेवक हे भाजपचेच निवडून येणार असा दावा येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला.
संबंधित बातम्या :
(seven corporators is gift to Uddhav Thackeray on occasion of Valentines Day said MLA Nitesh Rane)