‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, शहाजीबापू पाटलांनी भर सभेत मनातली खदखद बोलून दाखवली

शहाजीबापू पाटील यांनी राज्याच्या राजकारणातील दोन राऊतांवर निशाणा साधलाय. वाचा...

'ह्या' दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, शहाजीबापू पाटलांनी भर सभेत मनातली खदखद बोलून दाखवली
शहाजीबापू पाटीलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 11:28 AM

महेश सावंत, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी अशाच त्यांच्या रोखठोक आणि हटके शैलीत राज्याच्या राजकारणातील दोन राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊतांवर (Vinayak Raut) शहाजीबापूंनी निशाणा साधलाय. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

भाजपचे नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी जोरदार बॅटिंग केली.

शहाजीबापू काय म्हणाले?

दोन राऊतांवर माझा लई राग हाय…या दोन राऊतांनी आमचं सगळं वाटोळं केलंय, असं म्हणत शहाजीबापूंनी संजय राऊत आणि विनायक राऊतांवर निशाणा साधलाय.

लोकसभेच्या निवडणुकीला कोकणात येऊन धुरळा पाडणार.निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हणालात तरी मी येणार… संजय राऊत निवडणुकीला उभा राहत नाही नाहीतर तिथं पण गेलो असतो. राऊतांचा निवडणुकीततील पराभव अटळ आहे, असं शहाजीबापू म्हणालेत.

सिंधुदुर्गातील कुडाळमधील एका जाहीर कार्यक्रमात शहाजीबापू पाटलांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी माजी खासदार निलेश राणेदेखील स्टेजवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शहाजीबापूंचं भाषण झालं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं.

ऐतिहासिक परंपरा असलेल्या चिन्हावर शिखांनी दावा टाकणं चुकीचं आहे, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर शिख समाजाने घेतलेल्या आक्षेपावर शहाजीबापू पाटील यांनी आपलं मत मांडलं.

ढाल-तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.आमचं हिंदवी स्वराज्य मावळ्यांनी उभं केलं. ते ढाल-तलवार हातात घेऊनच उभं केलं आहे.आज शिखांनी आक्षेप घेतला. उदया राजस्थानमधील राजपूत म्हणतील नंतर कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे आमचं चिन्ह आहे आणि आमचंच राहणार, असंही शहाजीबापू म्हणालेत.

Non Stop LIVE Update
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.