सांगा धनुष्यबाण कुणाचा? यावर बाळासाहेबांचं नाव घेत शंभुराज देसाईंचा ‘हा’ दावा
आम्ही विचाराचे वारसदार ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण आम्ही वैचारिक वारसादार आहोत, असं शंभुराज देसाई म्हणालेत.
मुंबई : ” बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही केवळ एक व्यक्ती नव्हे तर विचार आहेत. आणि आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. ठाकरे परिवार संपत्ती आणि कुटुंबाचे वासदार जरूर असतील. पण आम्ही वैचारिक वारसादार आहोत. चिन्हं रुजवायला वेळ जाईल. पण आमची शिवसेना शाखांपर्यंत जाईल”, असं शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणालेत. “चिन्हं आम्हालाच मिळेल. बहुमतातील शिवसेना आमच्याकडे आहे. आमदार खासदार नगरसेवक सरपंचाचं बहुमत आमच्याकडे आहे. लोकांमधून आलेले लोकप्रतिनिधींचं बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्हं मिळेल अशी आशा आहे. आम्हाला कोर्टाकडे अपेक्षा आहे”, असंही ते म्हणाले आहेत.
धनुष्यबाणावर काय म्हणाले?
चिन्हं नाही मिळालं तर सर्व बाजूने आमची तयारी आहे. ज्वलंत हिंदुत्व कुणाकडे आहे हे लोकांना माहीत आहे. आमचं हजारो लोकांनी स्वागत केलं. लोकं आमच्या स्वागताला आजही येत असतात. शिंदे जातात तिथे लोक येत असतात. आमचा निर्णय योग्य असल्याचं सांगत आहेत, असं म्हणत धनुष्यबाण आमचाच असल्याचं शंबुराज देसाई यांनी ठणकावून सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे निर्णय घेतील तो मान्य आहे. शिंदेंसोबत आम्ही 40 आमदार आहोत. जो निर्णय घ्यायचा तो अधिकार शिंदे यांना दिले आहे. हिंदुत्वावादी मतांचं विभाजन होऊ नये हे आम्हाला वाटतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांना आमचा फुल सपोर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
टीव्ही 9 मराठीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंत्री शंभुराज देसाई आले होते. तेव्हा त्यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. यावेळी झालेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. धनुष्यबाण, बाळासाहेबांचा विचार या सारख्या मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडलं.