“आम्हाला षंड म्हणता, मग तुम्ही बेळगावला का गेला नाहीत?”, शंभूराज देसाई यांचा राऊतांना सवाल
शंभूराज देसाई यांची संजय राऊतांवर टीका...
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border) आता चिघळत चालला आहे. यावरून राज्यातील नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. बेळगावला जाण्यावरून ठाकरेगटाचे नेते संजय राऊत आणि शिंदेगटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. “संजय राऊत सातत्याने आम्हाला षंड म्हणत आहेत, मग त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही बेळगावला का गेला नाहीत?”, असं शंभुराज देसाई म्हणालेत.
सातत्याने संजय राऊत आमच्यावर टीक करत आहेत. पण जेव्हा बेळगावला जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तिथं जाणं टाळलं. आम्हाला षंड म्हणण्याऐवजी राऊतांनी बेळगावला जाण्याचं धाडस दाखवायला हवं होतं, असं शंभुराज देसाई म्हणालेत.
बेळगावला गेल्यावर माझ्यावर हल्ला झाला तर तो महाराष्ट्रावरचा हल्ला असेल, असं संजय राऊत म्हणतात. पण अवघा महाराष्ट्र जाणतो की राऊतांना अटक कोणत्या प्रकणामध्ये झाली होती ते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ज्यांना अटक झाली त्यांनी हे बोलण्याचा अधिकार नाही, असं देसाई म्हणालेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून देसाई आणि राऊतांमध्ये जुंपली आहे. दोन्ही नेते पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे.
मला धमक्यांचे दोन फोन आल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. कन्नड रक्षण वेदिकेने धमकीचा फोन केल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.मात्र त्याचवेळी माझ्यावर हल्ला झाला तर तो माझ्यावरील हल्ला नसून महाराष्ट्रावरील हल्ला असेल, असं राऊत म्हणालेत. त्यावर राऊतांना देसाई यांनी उत्तर दिलं आहे.