पवार काका-पुतण्यांची मावळ आणि बारामतीतच दमछाक? राज्यातील उमेदवार वाऱ्यावर

LOKSABHA ELECTION 2019 :  बारामती, मावळ आणि माढा या तीन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे बारामती आणि मावळ मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या व्यूहरचनेमुळे पवार कुटुंबाची चांगलीच दमछाक झाली आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना मुलासाठी मावळ सोडता येईना, तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना मुलीसाठी बारामती सोडता येईना. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष […]

पवार काका-पुतण्यांची मावळ आणि बारामतीतच दमछाक? राज्यातील उमेदवार वाऱ्यावर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

LOKSABHA ELECTION 2019 :  बारामती, मावळ आणि माढा या तीन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे बारामती आणि मावळ मतदारसंघात सत्ताधाऱ्यांच्या व्यूहरचनेमुळे पवार कुटुंबाची चांगलीच दमछाक झाली आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना मुलासाठी मावळ सोडता येईना, तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना मुलीसाठी बारामती सोडता येईना. यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष झालंय.

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी बारामती, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीकडे अधिक लक्ष दिलंय. त्यामुळे सांगली सोडून मंत्री चंद्रकांत पाटलांनी तर थेट बारामतीत घर भाड्याने घेऊन बस्तान मांडलंय. बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागा जिंकण्याचा त्यांनी चंग बांधलाय.

भाजपच्या बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जोरदार टक्कर दिली आहे. बारामतीच्या माहेरवाशीण असलेल्या कांचन यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे.

मतदारसंघातील नाराजांची नाराजी दूर करण्यातच पवारांची दमछाक होताना दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये बारामती आणि इंदापूर राष्ट्रवादीकडे, पुरंदर शिवसेनेकडे, भोर काँग्रेसकडे तर दौंड भाजपचा मित्रपक्ष रासपकडे आहे. मात्र पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप, तर इंदापुरातून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं बोललं जातंय. तर भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे पवार कुटुंबाशी जुने राजकीय वैर आहे.

दुसरीकडे मावळमध्ये पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. तिकडेही मुलासाठी अजितदादांना उन्हाच्या तडाख्यात मतांचा जोगवा मागावा लागतोय. मावळमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर अजितदादांची मोठी भिस्त होती. मात्र त्यांनी आता पाठ दाखवल्यामुळे दादांची चांगलीच गोची झाली आहे. एकूणच काय तर भाजपने पवार-काका पुतण्याची जिल्ह्यात नाकेबंदी केल्यामुळे राज्यातील इतर राष्ट्रवादीचे उमेदवार वाऱ्यावर असल्याचं चित्र आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.