राष्ट्रवादी आणि भाजपाचे दोन बडे नेते आज एकाच व्यासपीठावर, मुद्दा शिक्षणाचा, राजकीय टीका-टिप्पणी होणार?

औरंगाबादच्या विद्यार्थी आणि नागरिकांना आज दोन दिग्गज नेत्यांचं भाषण ऐकण्याची संधी आहे.

राष्ट्रवादी आणि भाजपाचे दोन बडे नेते आज एकाच व्यासपीठावर, मुद्दा शिक्षणाचा, राजकीय टीका-टिप्पणी होणार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 8:29 AM

औरंगाबादः महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या (Maharashtra Politics) नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे लागल्या आहेत. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डी लीट पदवी मिळणार आहे.

पाच वर्षांपूर्वीही शरद पवार आणि नितीन गडकरी औरंगाबादमध्ये एकत्र आले होते. शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तो कार्यक्रम होता. त्यानंतर आज हा योग जुळून आला आहे. दोन्ही पक्ष कट्टर राजकीय विरोधी असले तरीही शरद पवार आणि नितीन गडकरी यांचं मैत्र महाराष्ट्रात ख्यात आहे.

शरद पवार यांना आतापर्यंत 9 मानद पदव्या मिळाल्या आहेत. तर औरंगाबाद विद्यापीठात तिसऱ्यांदा हा सन्मान मिळतोय. देशातील रस्ते विकासात नितीन गडकरी तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद पवार यांचा गौरव आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केला जाणार आहे.

एकूणच, दोन दिग्गज राजकीय नेते एकत्र येणार असले तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दीक्षांत समारोहाचे व्यासपीठ असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना काही मौल्यवान अनुभवाचे बोल ऐकण्याची संधी मिळू शकते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यापीठातील हा 62 वा दीक्षांत समारंभ आहे. नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भाटकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल. यंदा बामू विद्यापीठात जवळपास 1.05 लाख विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट डिग्री संपादन केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.