मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. (Sharad Pawar Meet Sanajy Raut) संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून ही भेट घेण्यात आली. शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली. नुकतंच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. यानंतर काल (5 डिसेंबर) संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Sharad Pawar and Sanjay Raut discussed on farmer protest)
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर या भेटीत चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी पंजाब आणि हरियाणा आणि इतर राज्य गहू मोठय प्रमाणात उत्पादित करत असल्याचे सांगितले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी गहू उत्पादित केल्याचा फायदा इतर ठिकाणी होतो, असंही शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे तसेच केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. जो शेतकरी कायदा केला आहे, त्याबाबत सरकारने चर्चा केली पाहिजे होती. ती केली गेली नाही घाई घाईत निर्णय घेतला गेला, असल्याचंही शरद पवार म्हणाले.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत मुंबई कृषी कायद्यांच्या समर्थनात आंदोलन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरच कामाला लागतील, डॉक्टरांनी काही पथ्य पाळण्यास सांगितली आहेत. ते देखील पाळतील असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. (Sharad Pawar and Sanjay Raut discussed on farmer protest)
शेतकरी आंदोलनाचा अकरावा दिवस
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन आज अकराव्या दिवशी देखील सुरु आहे. शनिवारी (5 डिसेंबर) ला शेतकरी आणि केद्र सरकारमध्ये 5 तास बैठक झाली मात्र, ती देखील निष्फळ ठरली.
संजय राऊतांवर बुधवारी (2 डिसेंबर) शस्त्रक्रिया
संजय राऊत यांच्यावर बुधवारी (2 डिसेंबर) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी दोन स्टेन त्यांच्या ह्रदयात टाकण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. खरतंर, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीवेळी एकूण तीन स्टेन टाकण्यात आले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Sharad Pawar Meet Sanjay Raut | शरद पवार संजय राऊतांच्या भेटीला, प्रकृती विचारपूस, सोबतच राजकीय चर्चा?https://t.co/kxUO1HUmNK #SharadPawar #sanjayRaut @rautsanjay61 @PawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
संबंधित बातम्या :
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर भेट, कोणत्या विषयांवर चर्चा?
… तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल : शरद पवार
(Sharad Pawar and Sanjay Raut discussed on farmer protest)