अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल : शरद पवार
अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मुंबई : “आम्ही तीनही पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार आहोत. आमच्याकडे संख्याबळ आहे. अजित पवारांनी जे केलं ते योग्य नाही. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, आम्ही पुन्हा तिन्ही पक्ष सरकार स्थापनेचा दावा करून बहुमत सिद्ध करून दाखवू, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रच राहणार आहोत, कुठल्याही परिस्थितीला तीनही पक्ष मिळून तोंड देण्यास तयार आहोत, असं पवारांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात रातोरात राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भल्या पहाटे महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांना शपथही देण्यात आली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र शरद पवार यांनी हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही घरात आणि पक्षात फूट पडल्याचं स्टेटस ठेवलं.
या सर्व घडामोडीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं.
शरद पवार काय म्हणाले?
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार असे मिळून आमदारांची संख्या 169-170 च्या आसपास जाते. काल आमची बैठक झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या. सकाळी साडेसहा पावणे सात वाजता एका सहकाऱ्याने त्यांना राजभवनावर आणल्याचं सांगितलं.
नंतर आम्हाला लक्षात आलं की अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनावर गेले आहेत. त्यानंतर काही वेळातच टीव्ही चॅनलवर त्यांनी शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचा निर्णय शिस्तभंगाची कारवाई करावी असा निर्णय आहे.
जे काही सदस्य गेले आहेत आणि जे जाणार असतील त्यांना हे माहिती असावं की आपल्याकडं पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यामुळे त्यांचं सर्व विधीमंडळ सदस्य जाण्याची शक्यता आहे. जनमानस पाहता राज्याचा सर्वसामान्य माणूस यांना कधीही पाठिंबा देणार नाही. त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुकांचा निर्णय घेतला तर आम्ही तिन्ही पक्ष त्यांचा निवडणुकीत पराभव करण्याची आमची जबाबदारी आहे.
10 ते 11 आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. हा प्रकार घडल्यानंतर काही आमदारांनी आमच्याशी संपर्क करायला सुरुवात केली. बुलडाण्याचे आमदार डॉ शिंगणे तेथे होते. राजभवनावरुन सुटका झाल्यावर ते माझ्याकडे आले.
राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे आमदार – मला अजित पवारांकडून रात्री बारा वाजता फोन आला, चर्चेसाठी बोलावण्यात आलं. तेथून आम्हाला थेट राजभवनात नेण्यात आलं. राजभवनावर जाऊपर्यंत आम्ही कशासाठी आलो आहे याची माहिती नव्हती. सकाळी सात वाजता मुंडे यांच्या बंगल्यावर गेलो, त्यावेळी 7 ते 8 आमदार आले. आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती, आम्हाला तिथं राजभवनावर नेलं, तेव्हा आम्हाला अंदाज आला. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस आले त्यानंतर आम्हाला अंदाज आला. मात्र, काही वेळेतच राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. आम्ही त्यावेळी अत्यंत अस्वस्थ होतो. शपथविधी झाल्यावर मी थेट पवारांच्या बंगल्यावर गेलो मी पवारांसाहेबांसोबत आहे. मी राष्ट्रवादीसोबत आहे. शरद पवार यांच्यासोबतच आहे. आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही गेलो.
संदीप क्षीरसागर – आत्ता तुम्ही जे ऐकलं ते माझ्यासोबत घडलं. राजभवनात गेल्यावर आम्हाला हे कळलं. मात्र, राजभवनाबाहेर आल्यावर आम्ही शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार – यावरुन दोन गोष्टी दिसतात. प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांच्या सह्या घेऊन ते पत्र आपल्याकडे ठेवली होती. माझ्याकडे देखील तशी यादी होती. यातील 2 यादी अजित पवारांनी कार्यालयातून घेतल्या. त्याच यादी त्यांनी राज्यपालांना दिल्या असाव्यात. मात्र, त्यावर जर सरकार स्थापन झालं असेल, तर त्या कार्यालयीन उपयोगासाठीच्या सह्या होत्या. त्यावर 54 सह्या होत्या. मात्र, पाठिंबा असल्याचं भासवत ते पत्र सादर केलं असेल तर राज्यपालांची चूक होण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्यासाठी सांगितलं आहे. त्यादिवशी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून जी खबरदारी घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे , तसं होईल.
आम्ही तिन्ही पक्षांच्या सरकारचं नेतृत्व शिवसेनेने करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, कोणत्याही परिस्थिती आम्ही सोबत राहू. काँग्रेसचे नेतेदेखील सोबत होते. मात्र, त्यांची विधीमंडळ बैठक होती त्यासाठी ते गेले आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
देशात लोकशाहीच्या नावाने जो कारभार सुरु आहे तो चुकीचा आहे. जे नवं हिंदुत्व आलं आहे त्याचं हे काम आहे. शिवसेना जे करते ते उघड करते, ते आमदार फोडून करतात. बिहारमध्ये त्यांनी लालू आणि नितीशचं सरकार फोडलं आणि सरकार पाडलं. त्यांच्या मीपणाबद्दल ही लढाई आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पाठीवर वार केल्यावर महाराजांनी काय केलं होतं ते त्यांनी समजून घ्यावं.
राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहाटे बैठक झाली होती. हे असं झालं जसं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायचं होतं. यापुढे जे होईल ते कायद्यानुसार संविधानानुसार होईल.
शरद पवार – अनेक लोक लांबून येत आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. आत्ता आम्ही बैठक घेत आहोत, त्यात ते लगेच उपस्थित होणार नाही. त्यामुळे ते नाहीत असं समजू नका. अजित पवारांवर कारवाई करावी लागेल, होईल. मात्र, तो निर्णय कुणी एक व्यक्ती घेणार नाही, बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल.
अजित पवार असा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं. मला कुटुंबाची काळजी वाटत नाही. मी या परिस्थितींमधून गेलेलो आहे. 1980 मध्ये 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी अनेक आमदार सोडून गेले होते. त्यावेळी सोडून गेलेले आमदार पराभूत झाले – शरद पवार
बहुमताची आकडेवारी आमच्याकडे आहे आणि आम्ही सरकार बनवू. सुप्रिया सुळेंच्या नावाचा यात काहीही संबंध नाही. त्या संसदेच्या सदस्य असून राष्ट्रीय स्तरावर काम करतात, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांची पत्रकार परिषद LIVE
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष आमदार असे मिळून आमदारांची संख्या 169-170 च्या आसपास जाते. काल आमची बैठक झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या. सकाळी साडेसहा पावणे सात वाजता एका सहकाऱ्याने त्यांना राजभवनावर आणल्याचं सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं.
[svt-event title=”सुप्रिया सुळे स्वत: उद्धव ठाकरेंच्या स्वागताला” date=”23/11/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ]
#WATCH Mumbai: Nationalist Congress Party’s Supriya Sule receives Shiv Sena’s Uddhav Thackeray and Aditya Thackeray outside YB Chavan Centre, where Congress-NCP-Shiv Sena will address the media shortly. pic.twitter.com/Y2ZaUClDic
— ANI (@ANI) November 23, 2019
[/svt-event]
- उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले
- उद्धव ठाकरे थोड्याच वेळात वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचणार
- शरद पवार वाय बी सेंटरमध्ये पोहोचले
- अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता
- थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद
राजभवनात शपथविधी
दरम्यान, भाजप-राष्ट्रवादीचं सरकार येणार हे निश्चित झाल्यानंतर राजभवनात शपथविधी आयोजित करण्यात आला. सकाळी 8 वाजता राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
याबाबत अजित पवार म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरिही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थीर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू.”
शरद पवार यांचं स्पष्टीकरण