शरद पवारांनी रणशिंग फुंकलं, स्वत:च्या मतदारसंघात पहिली बैठक

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात रणशिंग फुंकलं आहे. कारण शरद पवार यांनी सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पवार स्वत: कामाला लागले आहेत.  त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शरद पवारांनी बैठक बोलावली. आजच्या या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद […]

शरद पवारांनी रणशिंग फुंकलं, स्वत:च्या मतदारसंघात पहिली बैठक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात रणशिंग फुंकलं आहे. कारण शरद पवार यांनी सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पवार स्वत: कामाला लागले आहेत.  त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शरद पवारांनी बैठक बोलावली. आजच्या या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. एकंदरीत पवारांच्या या बैठकीला काँग्रेस आणि शेकापचे महत्त्वाचे आमदार उपस्थित असल्याने पवारांनी निवडणूक आखाड्यात शड्डू ठोकल्याचं चित्र आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पवारांनी बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत शरद पवार पुढील रणनीती ठरवणार हे निश्चित आहे. पवारांनी बैठक बोलावून कामाला सुरुवात केल्याने, पक्षातील अन्य नेत्यांनाही आता धावाधाव करावी लागणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. मात्र खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनीच पवारांना माढ्यातून लढण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक न लढण्याची घोषणा केलेल्या शरद पवारांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं लागलं.

वाचा: पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या

पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार 

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.