लबाडाच्या घरचं आवतन, जेवल्याशिवाय खरं नसतं, पवारांचा टोमणा हसवणारा, पण टीका गंभीर! पाहा Video

शेतकऱ्यांसाठी ज्या बँकेचं कर्ज शिंदे सरकारने माफ केलंय, ती बँक अस्तित्वात तरी आहे का? असा सवाल शरद पवार यांनी केला.

लबाडाच्या घरचं आवतन, जेवल्याशिवाय खरं नसतं, पवारांचा टोमणा हसवणारा, पण टीका गंभीर! पाहा Video
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 2:30 PM

नविद पठाण, पुरंदरः  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारची आश्वासनं पोकळ असतात, त्यामुळे जरा सांभाळूनच घ्या, असा सल्ला शरद पवारांनी (Sharad Pawar) आज एका कार्यक्रमात दिला. विशेष म्हणजे हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी एक उक्ती वापरली. हे म्हणजे लबाडाच्या घरचं आवतन आहे. जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, असं पवारांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्ज माफीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला, त्यावर शरद पवार यांनी टीका केली. पुरंदर येथील एका शेकतऱ्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रावदी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या 34, 788 कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. यामुळे सुमारे 69 हजार हेक्टर शेतजमिनीवरचा भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी होणार आहे, असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय.

शरद पवार यांनी यावर टीका केली. ते म्हणाले, भूविकास बँकेचं कर्ज माफ केल्याचं म्हणतायत. पण मला सांगा गेल्या 10  वर्षात एका तरी माणसानं भू विकास बँकेचं कर्ज घेतलंय का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? जशी पीईसी माहितीय, तशी भूविकास बँक माहितीय का? आता तिचं नाव नाही. 25-30 वर्ष झाली. कुणीही वसुलीला जात नाही. आता माहितीय तिची वसुली होणार नाही….

अशा बँकेचं कर्ज माफ केल्याचं करुन टाकलं. हे म्हणजे लबाडाच्या घरचं आवतन असतं, जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय…

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही. राज्यातील नुकसानीचा आम्ही आढावा घेत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारला याची माहिती पाठवणार आहोत.

पुरंदरविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा आलो, तेव्हा तुम्ही मला मोकळ्या हाताने पाठवलं नाही. तुमची साथ मला प्रत्येक निवडणुकीत लाभली…

काहींना वाटतंय मी म्हातारा झालोय. पण तुम्ही अजून काय बघितलंय, असा सवाल शरद पवार यांनी केला. यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.