Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले

एकीकडे प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतीतून दाखवून (Corona Virus Sharad Pawar No Handshake) दिलं.

कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 3:19 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज (Corona Virus Sharad Pawar No Handshake) आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वांना खबरदारीचे उपाय सांगण्यात येत आहेत. एकीकडे प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतीतून दाखवून दिलं.

प्राथमिक शिक्षा, कौशल्य विकास, बाल संरक्षण या क्षेत्रात कार्य (Corona Virus Sharad Pawar No Handshake) करणाऱ्या प्रथम संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाय बी चव्हाण प्रतिष्ठान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रथम संस्थेला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी कोरोना सुरक्षिततेबाबत अप्रत्यक्ष संदेश दिला. शरद पवारांनी पुरस्कार घेतल्यानंतर हात मिळविण्यासाठी आलेल्या पुरस्कारकर्त्याला, हात न मिळविता दोन वेळा हात जोडून नमस्कार केला. शरद पवारांच्या या कृतीने सभागृहात हशा पिकला, तर पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य दिसलं.

शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मला न्याय द्यावा, विद्या चव्हाणांच्या सुनेची विनंती

प्रथम संस्थेच्या शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना समर्पित करण्यात आलेल्या पुस्तकाचे शरद पवारांनी विमोचन केले.

या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी भाषण केले. यात शरद पवारांकडून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. “माझं स्वतःच शिक्षण जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागात झालं. स्त्रीने शिक्षणाची आस्था सोसल्यानंतर सर्व घर बदलते. आईने शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवणही पवारांनी यावेळी काढली.”

“जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे 100 दिवसात फाटले, होळी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला”

“माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम जे.पी.नाईक आणि चित्रा नाईक यांच्यामुळे झाला. आशियात प्राथमिक शिक्षणात मोलाची कामगिरी करणाऱ्यांसोबत मला त्यावेळी काम करण्याची संधी मिळाली,” असे शरद पवार म्हणाले.

“शिक्षण देणाऱ्या घटकांच्या शिकवण्याचा दर्जा सुधारण्याचीही गरज आहे. शिक्षणात अजून खूप काही करायचे बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा अजून सुधारण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी बीडमधील एका शाळेला अचानक दिलेल्या भेटीचा किस्साही पवारांनी (Corona Virus Sharad Pawar No Handshake) सांगितला.”