डेस्कवर चष्मा विसरलेल्या गृहमंत्र्यांना पवारांचा सूचक सल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (6 जानेवारी) बारामतीत मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुखही (Sharad Pawar give suggestion to anil deshmukh) उपस्थित होते.

डेस्कवर चष्मा विसरलेल्या गृहमंत्र्यांना पवारांचा सूचक सल्ला
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 11:20 PM

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (6 जानेवारी) बारामतीत मुलींच्या वस्तीगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुखही (Sharad Pawar give suggestion to anil deshmukh) उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एक किस्सा तेथील उपस्थितांना सांगितला. पवार म्हणाले, “अनिल देशमुख हे डेस्कवर चष्मा विसरले होते. मी त्यांना तो चष्मा परत दिला आणि तो परत देताना गृहमंत्र्याची दृष्टी सर्वत्र असली पाहिजे, असं मी (Sharad Pawar give suggestion to anil deshmukh) सांगितले.

“पूर्वी इंजिनिअर खूप कमी होते. मात्र आता कोणत्याही गावात पाच पन्नास इंजिनिअर आहेत. तांत्रिक शिक्षणाची सध्या गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी तीन इंजिनीअरिंग कॉलेज होत. मात्र आता बारामतीत तीन कॉलेज आहेत”, असं पवार म्हणाले.

“इथं इंजिनिअरिंगचा एक हजार रुपये देऊन प्रवेश दिला जातो. तर उर्वरित रक्कम ऊस बिलातून घेतली जाते. राज्यात एमआयडीसीचं जाळे निर्माण केलं. इथ लाखो रोजगार उपलब्ध झाले आहेत”, असंही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, “मुलींच्या हातात मोबाईल पाहतो. सेल्फीसाठी माझ्यापुढे येतात. हा पूर्वी आत्मविश्वास त्यांच्यात नव्हता. अनेक मुली विमान चालवत आहे. मुलींना पायलट केल्यानं अपघात प्रमाण कमी झालं आहे. मुली कोणतीही कामं बारकाईने करतात. मात्र आपले लक्ष इतरत्र असते त्यामुळं आपल्याकडून अपघात होतो. हे मला हवाई दल प्रमुखांनी सांगितलं”.

“मुलांबरोबर मुलींनी शिकलं पाहिजे. ही भूमिका, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली घेतली. मुलींची शाळा सुरू केली. आज अनेक मुली शिक्षण घेत आहे. राज्यात 40-50 टक्के पेक्षा जास्त मुली शिकत आहेत. मुलींमुळे घर बदलत आहे”, असं पवारांनी सांगिते.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....