मावळात बदल घडतोय, मंत्री महोदय दुसरं काम पाहा, पवारांचा बाळा भेगडेंना टोला

मावळ परिसरतील तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमलेली असल्यामुळे ही नव्या बदलाची नांदी असल्याचं ते (Sharad Pawar Bala Bhegade) म्हणाले.

मावळात बदल घडतोय, मंत्री महोदय दुसरं काम पाहा, पवारांचा बाळा भेगडेंना टोला
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 4:02 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Bala Bhegade) यांनी मावळमध्ये सभा घेतली. गर्दी पाहताच त्यांनी मावळचे आमदार आणि मंत्री बाळा भेगडे यांना टोला लगावला. ‘मंत्री महोदय यहा कुछ बदलाव आ चुका है, दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो,’ असं पवार म्हणाले. मावळ परिसरतील तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमलेली असल्यामुळे ही नव्या बदलाची नांदी असल्याचं ते (Sharad Pawar Bala Bhegade) म्हणाले.

महाराष्ट्राने मला भरभरुन दिलं, मुख्यमंत्री पद, केंद्रीय मंत्री पद, 52 वर्ष सलग माझ्यावर प्रेम केलं, असं म्हणत आता मला सत्ता तरुणाच्या हाती द्यायची आहे, म्हणून बदल हवा, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

गेल्या दोन महिन्यात नाशिकमधील कारखान्यात 15 हजार कामगार कामावरून कमी केले, पिंपरी चिंचवड शहरात देखील हीच अवस्था आहे. आणखी कारखाने काढले, नोकऱ्या देण्यासाठी मात्र सध्या परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. म्हणून बदल महत्त्वाचा आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

चिंचवड आणि भोसरीतून घड्याळ हद्दपार

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ओढावली आहे. कारण, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघासाठी पक्षाला उमेदवारही देता आले नाही. या दोन मतदारसंघात अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झालाय, तर दुसऱ्या मतदारसंघात उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातून पक्षाचं चिन्ह हद्दपार झालं आहे. तर, पिंपरी मतदारसंघातही उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढावली.

संबंधित बातम्या :

शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही, भाजप नेते प्रमोद जठार यांचा आरोप

खडसे, तावडे, मेहता, बावनकुळे आणि पुरोहितांचे तिकीट का कापलं?

राष्ट्रवादीला धक्का, चिंचवडमधील उमेदवाराचा अर्ज बाद

125 जागांसाठी 40 स्टार प्रचारक, राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.