Maharashtra Politics: शरद पवार दिल्लीत, महाराष्ट्रातील घडामोडींवर अजित पवारांचे बारीक लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून त्यांच्या सरकारी निवासस्थानी थांबले आहेत. सेनेतील सर्व घडामोडींवर अजितदादांचे बारीक लक्ष आहे. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून पोलीस ताफा घेऊन न जाता बाहेर पडत असल्याचेही समजते. शिवाय सरकारी वाहन न वापरता स्वतःच्या वाहनातून बाहेर पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. राज्यात अनेक बड्या राजकीय घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.

Maharashtra Politics: शरद पवार दिल्लीत, महाराष्ट्रातील घडामोडींवर अजित पवारांचे बारीक लक्ष
शरद पवार, अजित पवारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 6:04 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या(Eknath shinde) बंडखोरी प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. रॅली, बैठका अशा विविध माध्यमातून शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray), युवा नेते आदित्य ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. एकनाथ खडसे गटाचे हे बंड मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडी आता कायदेशीर लढाई लढणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद(Sharad Pawar) पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) देखील अलर्ट मोडवर आहेत. शिवसेनेतील घडामोडींवर अजित पवारांचे बारीक लक्ष आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून त्यांच्या सरकारी निवासस्थानी थांबले आहेत. सेनेतील सर्व घडामोडींवर अजितदादांचे बारीक लक्ष आहे. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून पोलीस ताफा घेऊन न जाता बाहेर पडत असल्याचेही समजते. शिवाय सरकारी वाहन न वापरता स्वतःच्या वाहनातून बाहेर पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे. राज्यात अनेक बड्या राजकीय घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेची साथ सोडायची नाही. अशा संकटाच्या वेळी तर बिलकूल साथ सोडायची नाही, असे आदेशच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहेत.

शरद पवार दिल्लीत

आमच्या पार्टीचा उद्धव ठकारेंना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांचे काही आमदार आसामला गेले आहेत. ते परत येतील. या आमदारांना भेटण्याची संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरे सरकार चालवू शकतात हे स्पष्ट होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पवारांना सरकार राहील की नाही याबाबत साशंकता असल्याचं त्यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. तसेच आमदार पुन्हा माघारी परतण्याच्या मूडमध्ये नसल्याचंही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राज्यात नेमकं काय होणार? याबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे.

राज्यात दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ही दावा केलीय. या जिल्ह्यात प्रत्येकाला प्रत्येकाचा मान द्या. या सरकाच्या गडबडी चालल्या आहेत. म्हणून मी बोलत नाही. मात्र अधिकाऱ्यांना प्रटोकॉल समजूत नाही का? अधिकाऱ्याचं काम आहे. पत्रिका देणं, इतका निर्लज्ज अधिकारी कोण आहे? जो फोनवर बोलतो. ही काय चांगली पद्धत नाही. उलट आम्ही विरोधी पक्षात असल्याने आम्हाला असं बोलायला भेटतंय. दोन तीन दिवसांनी हे पण बंद होणार आहे, असे सूचक विधान दानवे यांनी केलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.