Dipak Kesarkar : शरद पवार मोठे नेते, त्यांचं मन दुखावलं असेल तर घरी जाऊन माफी मागेन, दीपक केसरकरांचं वक्तव्य

अडीच वर्षात रखडलेली कामं आता होत आहेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांचेही चांगलेच कौतुक केले आहे. कोकणी माणसाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी झटक्यात मार्गी लावले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Dipak Kesarkar : शरद पवार मोठे नेते, त्यांचं मन दुखावलं असेल तर घरी जाऊन माफी मागेन, दीपक केसरकरांचं वक्तव्य
बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलात तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, दीपक केसरकरांचा ठाकरेंना इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 4:37 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसात शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आपल्या वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत आहेत. दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्यातील शाब्दिक चकमक ही महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत ते आता सावध भूमिका घेताना दिसत आहेत. शरद पवार महान नेते आहेत ते भेटतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांच्या विरोधात कधीच टीका करणार नाही आणि माझ्या कुठल्या वक्तव्याने ते दुखावले असतील तर मी स्वतः सिल्वर ओक येथे जाऊन दिलगिरी व्यक्त करेन, असे आज दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तसेच अडीच वर्षात रखडलेली कामं आता होत आहेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांचेही चांगलेच कौतुक केले आहे. कोकणी माणसाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी झटक्यात मार्गी लावले, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील

उद्धव ठाकरे चांगले मुख्यमंत्री होते पण आजुबाजूला बरोबर लोक नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री काम होऊ देत नव्हते. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे.  जिव्हाळ्याचे प्रश्न अडीच वर्षे प्रलंबित होते. परवा मुख्यमंत्र्यांसोबत बोललो आहे. 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील.  आंबोली घाट येथील जमिनीचे वाटप कसणाऱ्यांच्या नावे करावे, ही मागणी आहे. ते अनेक वर्षे प्रतीक्षेत होते. नवीन व्यवसाय करताना जमिनीवर कर्ज नाही. नुकसान झाल्यास भरपाईही मिळत नव्हती. मात्र आता प्राथमिक निर्णय झाला आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितलं आहे.

राज्याच्या विकासाची कामं करू

अंबोलीला विद्यापीठ व्हावं ही मागणी होती, लवकरच 50 एकर जमिनीवर विद्यापीठ होईल यावर लवकर निर्णय होईल, गोल्फ कोर्स करण्याच्या ऊद्देशानेही प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन जिल्हा विकसित होताना पर्यंटनाशी निगडीत कोर्सेस सुरू करणार आहे. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्यातील लोकांना ऊपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूरला जायचे, आत्ता तिथे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी लाॅ एंड ज्युडीशरीचा अहवाल मागवलाय, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 800 कोटींचं मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलसाठी विचार सुरू आहे. मेंदू, हृदय, युरोलाॅजी, कॅन्सर , सर्जरी होतील, कोणावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने काम करुया, तसेच केंद्राविरोधात जाऊन काम होत नसते. त्यासाठी समन्वयातून मार्ग काढायला हवा, असे मतही यावेळी केसरकरांनी व्यक्त केलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.