मुंबई : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हर हर महादेव चित्रपटावर टीका केली आहे, सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे, हर हर महादेव चित्रपटात एकूण ठरवून दिलेलं चित्र, शिरवळमधील महिलांविषयी असणारी भूमिका हे सर्वच निषेध करण्यासारखं आहे. या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाईस ओव्हर दिला आहे, पण चित्रपटाची संहिता समजून घ्यायला हवी होती.तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भोंदूबाबा आणि काळी जादू करणारे जादूगार आहेत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादू केली आहे, अशी टीका केली होती, त्या टीकेला देखील सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.
शरद पवार राजकारणातील जादूगार आहेत, अशी टीका करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणतात, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, रामदास कदम, अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते मातोश्रीवर जीव ओवाळून टाकण्याची भाषा करायचे ते, आता मातोश्रीविरोधात झाले आहेत, त्यांच्यावर ही जादू कुणी केली आहे, तर ही जादू देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे.शरद पवार हे राजकारणातील जादूगार नाहीत, तर देवेंद्रजी खरे जादूगार आहेत.ज्यांनी मातोश्रीसाठी जीव देणाऱ्या लोकांना मातोश्री विरोधात केलं आहे.
संजय राठोड आणि पुजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी आता संजय राठोड यांची माफी मागावी, अशी टीकायां सुषमा अंधारे यांनी केली आहे, तर भावना गवळी जशा नरेंद्र मोदी यांच्या दीदी झाल्या, तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं.
सत्तेत नसताना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली होती, राज्य सरकारला चौकशी करा, या मागणीसाठी धारेवर धरलं होतं, पण त्या आता या प्रकरणावर काहीही बोलायला तयार नसल्याने विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.