शरद पवार मध्यस्थितीला तयार, पण पर्याय काय त्यांच्यासमोरचे?

कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. त्यात आता मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती मिळतेय.

शरद पवार मध्यस्थितीला तयार, पण पर्याय काय त्यांच्यासमोरचे?
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 10:35 AM

मुंबई: कांजूर मार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यात आता मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती मिळतेय. (Sharad Pawar likely to mediate in metro car shed project dispute)

कांजूर मार्ग मेट्रो प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. कांजूरमार्गवरील मेट्रो प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे.

चर्चा करु, उद्धव ठाकरेंचं केंद्राला आवाहन

कांजूर मार्गच्या जागेवर राज्य सरकारने मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यावर केंद्राकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ती जागा मिठागराची असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय. तसंच काही पर्यावरणवादी आणि खासगी मालकीच्या लोकांनी या जागेवर कारशेड उभारण्यास विरोध केलाय. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. “केंद्राचे आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायानं भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे.

शरद पवार मैदानात

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

“शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील,” अशी माहिती मलिक यांनी दिली.

पवारांच्या मध्यस्थीवर भाजपची भूमिका काय?

“जी मेट्रो 2021 साली सुरु होणार असेल, ती 2024 मध्ये का सुरु करायची. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी बोलावे. आम्हाला काहीही अडचण नाही. तोडगा कुणीही काढला तरी आम्हाला आनंदच असेल,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल जेव्हा शरद पवार वाचतील तेव्हा तेही योग्य निर्णय घेतील. तेही आम्हाला विरोध करणार नाहीत अशी खोटच टिप्पणी फडणवीस यांनी केली.

आशिष शेलारांचा टोला

विषय क्रेडिटचा नाही, विषय मेट्रो, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनचा आहे. प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच! असं सांगत भाजप आमदार आशिष शेलार यांनी समर्थांचा एक श्लोक ट्वीट केलाय.

संबंधित बातम्या:

होय, मुंबईकर आणि महाराष्ट्रासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच; आदित्य ठाकरेंचा दावा

Sharad Pawar likely to mediate in metro car shed project dispute

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.