पवार साहेब मंत्री असताना शेतकरी प्रश्न लगेच सुटायचे, आता तसं होत नाही : राजू शेट्टी
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शेतकऱ्यांचा नाही, तर कारखानदारांचा नेता म्हणून नेहमी टीका करायचे. पण राजू शेट्टींना आता शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक करायचे. शरद पवार कृषीमंत्री असताना राजू शेट्टींनी तीव्र आंदोलनं केली. पण पवार मंत्री असताना आम्ही मांडलेले प्रश्न लगेच सुटायचे, आता तसं होत नाही, […]
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शेतकऱ्यांचा नाही, तर कारखानदारांचा नेता म्हणून नेहमी टीका करायचे. पण राजू शेट्टींना आता शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक करायचे. शरद पवार कृषीमंत्री असताना राजू शेट्टींनी तीव्र आंदोलनं केली. पण पवार मंत्री असताना आम्ही मांडलेले प्रश्न लगेच सुटायचे, आता तसं होत नाही, असं राजू शेट्टींनी म्हटलंय.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारसभेत राजू शेट्टी बोलत होते. बाजूलाच बसलेल्या शरद पवारांचं राजू शेट्टींनी कौतुक केलं.
“माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. मोदी यांच्या समोर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत राहिली नाही. उद्धव ठाकरे यांची अगोदरची भाषणं त्यांनी परत स्वतः ऐकावी. ‘सामना’मधील उद्धव ठाकरे यांची जुनी वक्तव्य पाहावीत. आत्ता मात्र भाजपा-शिवसेना एकत्र आली आहे. इतका यू टर्न बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नाही,” अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.
ज्याला कुटुंब नाही त्याने आमच्या कुटुंबावर बोलू नये : शरद पवार
या सभेत शरद पवारांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी तुम्ही आमच्या घरच्यांची काळजी करू नका. आम्ही एकत्र आहोत, पण ज्याला स्वतःचं घर (कुटुंब) सांभाळायचं कळत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरांची काळजी करू नका, तुम्हाला तर घरच नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
भाजपवाल्यांना सत्तेची मस्ती आली आहे. ज्या शेतकऱ्यांना रावसाहेब दानवे तुम्ही साले म्हणता आणि त्याच शेतकऱ्यांकडे मत मागायला जाता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.