टीव्ही 9 च्या वृत्तानंतर शरद पवार-अब्दुल चाचांची 22 वर्षांनी भेट, आयुष्याचं सार्थक झाल्याची अब्दुल गनींची भावना

सलग 22 वर्षे निलंगा ते काटेवाडी असा जवळपास 310 किमी प्रवास करणारे अब्दुल गनीभाई खडके (Sharad Pawar meet Abdul Gani Khadke) यांनी आज गोविंद बाग येथे शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

टीव्ही 9 च्या वृत्तानंतर शरद पवार-अब्दुल चाचांची 22 वर्षांनी भेट, आयुष्याचं सार्थक झाल्याची अब्दुल गनींची भावना
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 12:07 PM

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 22 वर्षे निलंगा ते काटेवाडी असा जवळपास 310 किमी प्रवास करणारे अब्दुल गनीभाई खडके (Sharad Pawar meet Abdul Gani Khadke) यांनी आज गोविंद बाग येथे शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून सायकल प्रवास करणाऱ्या अब्दुल गनीभाई खडके यांची शरद पवार यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या वाढदिवसानंतर शरद पवार यांनी अब्दुल गनीभाईंना (Sharad Pawar meet Abdul Gani Khadke) बारामतीतच थांबवलं होतं. त्यानुसार आज गनीभाईंची भेट झाली.

गेल्या 22 वर्षापासून मी पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येतोय. आतापर्यंत माझी त्यांच्याशी भेट झाली नव्हती. मात्र आज भेट झाली, आनंद वाटला, असं अब्दुलचाचांनी सांगितलं. अब्दुल खडके हे यंदाही निलंगा ते काटेवाडी असा जवळपास 310 किमी प्रवास करुन बारामतीत आले होते. टीव्ही 9 मराठीनेही हे वृत्त प्रकाशित केलं होतं, अब्दुल खडके आणि शरद पवारांची 22 वर्षात एकदाही भेट नाही, असं टीव्ही 9 च्या वृत्तात नमूद होतं.

या वृत्तानंतर शरद पवारांनी अब्दुल खडकेंना बारामतीतच थांबण्यास सांगितलं होतं. त्यानुसार अब्दुल खडके हे बारामतीत थांबले होते. शरद पवारांनी आज अब्दुल खडकेंना हार घालून त्यांचा सत्कार केला.

मी मनाने, दिलाने पवार साहेबांना मानतो. ते जाणता राजा आहेत. आजच्या भेटीने खूप आनंद झाला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. 22 वर्षापासून पवारसाहेबांची भेट झाली नव्हती, मात्र 22 नव्हे तर त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 44 वर्षांचा आनंद झाला, असं अब्दुल खडके म्हणाले.

310 किमी सायकलवरुन प्रवास

12 डिसेंबर रोजी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते येत असतात. मात्र अब्दुल गणी खडके यांच्या शुभेच्छा काही औरच असतात. “शरद पवार यांनी आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकासाठी जे काम केलंय ते न विसरता येणारं आहे. त्यामुळंच आपण या जाणत्या राजाला शुभेच्छा देण्यासाठी सायकलवरून येत असल्याचं” अब्दुल गणी खडके सांगतात. 

22 वर्षांपासून आपण शुभेच्छा देत असलो, तरी शरद पवार यांच्यासोबत भेट झालेली नाही. मात्र अजितदादा, सुप्रियाताई हे आवर्जून भेटतात. आता काही दिवसात आपली शरद पवार यांची भेट होऊ शकेल असं सांगतानाच तो आपल्यासाठी सर्वोच्च दिवस असेल, असं अब्दुल गनी खडके यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

22 वर्षात एकदाही भेट नाही, तरीही दरवर्षी 310 किमी सायकल प्रवास, अब्दुल चाचांचं अनोखं पवार प्रेम!

फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.