Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्र्यांचा भेटीला, राज्यसभेच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता

सहा जागांपैकी 2 जागा भाजपाच्या आणि तीन जागा प्रत्येकी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहावी जागा जी जागा आहे, ती कशी निवडून आणता येईल, याबाबात चर्चा होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे अपक्ष लढणार होते. त्यांना पाठिंबा देणार का. हेही स्पष्ट होईल.

Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्र्यांचा भेटीला, राज्यसभेच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता
उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खरगे मविआ आमदारांना मार्गदर्शन करणारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 5:54 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचले आहे. राज्यसभा निवडमुकांसाठी (Rajyasabha Eleciton) 10 जूनला मतदान होणार आहे. 31 मेला अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. यात सहा जागांपैकी 2 जागा भाजपाच्या आणि तीन जागा प्रत्येकी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहावी जागा जी जागा आहे, ती कशी निवडून आणता येईल, याबाबात चर्चा होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे अपक्ष लढणार होते. त्यांना पाठिंबा देणार का. हेही स्पष्ट होईल. दुसरीकडे खासदार संभाजीराजे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच इतरांचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कुणाला संधी कुणाला डच्चू?

संजय राऊत. पी. चिदंमबरम, प्रफ्फुल पटेल, विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल, विकास महात्मे, या सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे, तसेच खासदार संभाजीराजे यांचाही कार्यकाळ संपत आहे. ही सगळी बडी नावं आहेत. त्यामुळे यातील कुणाला पुन्हा संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपकडून कुणाच्या नावाची चर्चा?

या निवडणुकीची तयारी भाजने सुरू केली आहे. भाजपकडून भाजप नेते विनोद तावडे आणि महिला नेत्या विजया राहटकर यांचं नाव चर्चेत आहे. कालच विनोद तावडे यांना तिपुरात पर्यवेक्षकाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यसभेवरही त्यांना संधी देऊन त्यांचा मागील काही वर्षातला वनवास संपणार का याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील स्थितीबाबतही चर्चा

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. भाजपा आणि मनसेकडून सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येते आहे., वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांबाबतही चर्चा होण्याची शक्यता

सप्टेंबरनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, राज्यात 21 महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. राज्यात भाजपाला रोखण्यासाठी मविआ सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची इच्छा आहे. याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.