Sharad Pawar : शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये बैठकीला सुरुवात, 20 संघटनांच्या प्रतिनिधींची हजेरी; ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर तोडगा निघणार?

शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार काही संघटनांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं असलं तरी 20 ब्राह्मण संघटनांचे 60 प्रतिनिधी पवारांसोबत चर्चेसाठी उपस्थित झाले आहेत. यात आनंद दवे यांच्या ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं पवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाकारलं आहे.

Sharad Pawar : शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये बैठकीला सुरुवात, 20 संघटनांच्या प्रतिनिधींची हजेरी; ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर तोडगा निघणार?
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 6:12 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप सध्या होतोय. त्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मधल्या काळात केलेल्या वक्तव्यांमुळेही शरद पवार यांची प्रतिमा ब्राह्मणविरोधी (Brahmin) असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सांगलीच्या इस्लामपुरातील सभेत आमदार अमोल मिटकरींनी केलेलं वक्तव्य असो, केतकी चितळे प्रकरणातही अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य असो, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण ब्राह्मणविरोधी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशावेळी शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार काही संघटनांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं असलं तरी 20 ब्राह्मण संघटनांचे 60 प्रतिनिधी पवारांसोबत चर्चेसाठी उपस्थित झाले आहेत. यात आनंद दवे यांच्या ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं पवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाकारलं आहे.

पवारांनी बोलावलेल्या बैठकीला कोणत्या संघटना उपस्थित?

भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, रामभाऊ तडवळकर जागतिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे, सचिव अभिजीत आपटे आम्ही सारे ब्राह्मणचे भालचंद्र कुलकर्णी ब्राह्मण महासभेचे प्रकाश दाते समर्थ मराठी संस्थेचे अनिल गोरे चित्पावन ब्राह्मण संघाचे गाडगीळ गुरुजी समस्त ब्राह्मण समाजाचे काकासाहेब कुलकर्णी वरील संघटनांसह एकूण 20 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.

मिटकरी, भुजबळ आणि पुरंदरेंविषयीची भूमिका काय?

शरद पवार यांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी. आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे. पवार यांनी संध्याकाळी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ब्राह्मण महासंघ सहभागी होणार नाही, असेही ते म्हणाले. अमोल मिटकरींची त्यांनी आज कान उघाडणी करावी. पवार साहेबांना ब्राह्मण समाजाच्या वेदना माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी नाही. मात्र, पक्षातील काही नेत्यांची त्यांनी कानउघडणी करावी, अशी अपेक्षा दवे यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘आनंद आहे, इतक्या वर्षांनी त्यांना ब्राह्मणांची आठवण आली’

शरद पवार यांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली, यात आनंद आहे. त्याकडे नकारात्मकपणे पाहण्याची गरज नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते सोलापुरात सभेनंतर बोलत होते. सर्वांना बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, कोणत्याही समाजाची बैठक बोलावली जाऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.