Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंद्रीय शेतीचं धोरण कसं असावं?, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सेंद्रीय शेती धोरण कसं असावं? याबाबत राश्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. | Sharad pawar meeting Over organic Farming

सेंद्रीय शेतीचं धोरण कसं असावं?, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सेंद्रिय शेतीबाबतच्या धोरणाबाबत विशेष बैठक
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 4:15 PM

मुंबई : सेंद्रीय शेती (organic Farming) धोरण कसं असावं? याबाबत राश्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सेंद्रिय शेतीविषयक धोरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक पार पडली. (Sharad pawar meeting Over organic Farming)

सेंद्रिय शेती करणाऱ्यांना बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे- शरद पवार

सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करणे व त्यांचा जैविक शेती महासंघ तयार करणे या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असं या बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. येणाऱ्या काळातलं राज्याचं सेंद्रीय शेती धोरण कसं असेल याबाबत या बैठकीच चर्चा झाली.

विकेल ते पिकेल या धोरणानुसार शासन प्रोत्साहन देतंय- दादा भुसे

शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभागी होवून सेंद्रिय शेतीच्या पद्धती, उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन, बाजारपेठेशी संलग्न व्यवस्था निर्मिती, प्रमाणिकरण, या व इतर आवश्यक बाबी आत्मसात करून घ्याव्यात. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विकेल ते पिकेल या धोरणानुसार शासन प्रोत्साहन देत असल्याचे कृषि मंत्री भुसे यांनी सांगितले.

मार्केट लिंकेज महत्त्वाचे- बाळासाहेब पाटील

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मार्केट लिंकेज महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य पद्धतीने प्रमाणीकरण होणे आवश्यक असल्याचे सुचविले. उत्पादित मालाच्या प्रमाणिकरणासाठी यंत्रणा निर्माण करावी. शेतकऱ्यांना प्रशिक्षण हे कोणत्याही नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अविभाज्य अंग आहे. दर्जेदार प्रशिक्षण व त्यातील सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

आंब्यांची वाहतूक आणि विक्री याबाबतही सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा निर्यात आणि विक्री याविषयी विविध सूचना मांडल्या. शासनस्तरावर याविषयी धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Sharad pawar meeting Over organic Farming)

हे ही वाचा :

मास्क न लावल्याने संजय राऊतांना दंड, मास्क न लावण्याचं कारण राज ठाकरेंनी सांगावं, राऊतांचं आवाहन

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांचे नवे गाणे

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.