भाजपच्या वाटेवर असलेल्या अभिजीत पाटील यांना शरद पवारांनी वाटेतच गाठले आणि….
शरद पवारांनीच अभिजीत पाटील यांना थेट आपल्या कारमध्ये बसवुन चर्चा केली.
मुंबई : ईडीची धाड पडल्यानंतर अनेक दिग्गज नेते भाजपच्या छत्र छायेखाली जात आहेत. आता या नेत्यांच्या यादीत उद्योजकांची नावे देखील सामील होऊ लागले आहेत. पंढरपूर येथील तरुण उद्योजक आणि साखरसम्राट अशी ओळख असलेले अभिजीत पाटील(Abhijit Patil) यांच्यावर आयकर छापेमारी केल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या वर शिक्का मोर्तब होण्याआधीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांना गाठले आहे. यामुळे पाटील आता कोणत्या पक्षात जाणार याबाबत नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे.
अभिजीत पाटील यांनी गेल्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. सोलापूर जिल्ह्यातील 20 वर्षांपासून बंद पडलेला कारखाना देखील त्यांनी चालवायला घेतला होता. या कारखाना त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवला. यानंतरच ते आयकर विभागाच्या रडावर आले. त्यांच्या चारही कारखान्यांवर ईडीने धाड टाकली.
या प्रकरणात जास्त काही अपडेट नंतर समोर आली नाही. मात्र, यानंतर भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी पाटील यांच्यासह जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. ते यातून लवकरच बाहेर पडतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले होते. यामुळे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पेव फुटले होते. अद्याप पाटील यांनी पक्ष प्रवेशाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
दरम्यान, आयकर छाप्याच्या कारवाई नंतर अभिजीत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ते दिसले.
शरद पवारांनीच अभिजीत पाटील यांना थेट आपल्या कारमध्ये बसवुन चर्चा केली. या दोघांमध्ये काय चर्चा झाला याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
यामुळे आता पाटील कोणत्या पक्षाचा लोगो लावुन घेतात. अभिजीत पाटील भाजपात की राष्ट्रवादीत जाणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वाळू ठेकेदार ते साखर सम्राट; कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजीत पाटील हे पंढरपूरचे आहेत. अभिजित पाटील हे वाळू ठेकेदार होते. त्यांच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.
मात्र, नंतर अभिजित पाटील यांनी साखर क्षेत्रात एंन्ट्री घेतली. मागील 10 वर्षात त्यांनी आपली साखर सम्राट अशी नवी ओळख निर्माण केली.
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ते जास्त प्रकाशझोतात आले.
विठ्ठल सहकारी व धाराशिव साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. सध्या 5 साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक आणि नांदेड येथेही प्रत्येक एक आणि धाराशिव येथे एक कारखाना आहे.