परतीचा पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान, MCA निवडणूक, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. पाहा...
बारामती, पुणे : परतीच्या पावसाने राज्यात मोठं नुकसान झालंय. आधीच तोट्यात चाललेली शेती आता त्यातचं यंदा झालेला परतीचा पाऊस (Maharashtra Rain Update) बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणतोय. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरश:दैना केलीये. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्यावर भाष्य केलंय. तसंच MCA निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय.
दिवाळीनिमित्त शरद पवार बारामतीतील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आहे. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली. पिण्यासाठी आणि शेतीसाठी लागणारं पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं शरद पवार म्हणाले.
यंदा जसा चांगला पाऊस झाला. तसं या परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेतकरी अडचणीत आहे, असंही शरद पवार म्हणालेत.
सध्या दिवाळी आहे. अनेकांना हि दिवाळसणही साजरा करता आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहायला हवा, असंही शरद पवार म्हणालेत.
नुकत्याच झालेल्या MCA निवडणुकीत सर्व पक्षीय नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलंय. MCA निवडणुकीत सर्व पक्षीय नेते एकत्र आल्यास गैर काय?, असं पवारांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरही पवार बोललेत. उद्धव ठाकरे आजारी असल्याने ते उशीरा दौरा करत आहेत, असं पवारांनी सांगितलं आहे.