Sharad Pawar | कंगनाला आपण अधिक महत्त्व देतोय, तिच्याकडे दुर्लक्ष करावे – शरद पवार
"कंगनाच्या ऑफीसबाबत मला फारशी माहीती नाही, मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम ही काही नवीन गोष्ट नाही. महापालिका त्यांच्या कायद्यानुसार काम करते आहे", असं शरद पवार म्हणाले.
मुंबई : “कंगनाला आपण अधिक महत्त्व देतोय. तिच्याकडे दुर्लक्ष करावे”, (Sharad Pawar On Kangana Ranaut) अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या हस्ते आज प्रतिभा विश्वास लिखित पोलीस नभोमंडळातील “21 आयपीएस नक्षत्र” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते (Sharad Pawar On Kangana Ranaut).
यावेळी त्यांनी कंगना रनौतच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली. “कंगनाला आपण अधिक महत्त्व देतो आहे. लोक सिरियस घेत नाहीत. आपण गांभीर्याने पाहू नये याकडे दुर्लक्ष करावे”, असं शरद पवार म्हणाले. तसेच, “कंगनाच्या ऑफीसबाबत मला फारशी माहीती नाही, मुंबईतील बेकायदेशीर बांधकाम ही काही नवीन गोष्ट नाही. महापालिका त्यांच्या कायद्यानुसार काम करते आहे”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या हस्ते आज प्रतिभा विश्वास लिखित पोलीस नभोमंडळातील “21 आयपीएस नक्षत्र” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.
यावेळी शरद पवारांनी त्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबतही प्रतिक्रिया दिली. “मला याआधी सुद्धा धमक्यांचे फोन येत होते याला गांभीर्याना घेत नाही”, असं ते म्हणाले (Sharad Pawar On Kangana Ranaut).
“या पुस्तकाच्या माध्यमातून पोलिसांबद्दल माहिती मिळेल. अनेकांच्या मनात पोलिसांबद्दल समज-गैरसमज असतात, पोलिस अधिकारी सकाळी 8 पासुन मध्यरात्रीपर्यंत काम करत असतात. सध्या मुंबईत चर्चा सुरु आहे, मुंबईची सुरक्षा करण्याचे काम मुंबई पोलीस करतात, पोलिसांवर होत असलेल्या टीकेबाबत मी अस्वस्थ राहतो”, असं म्हणत शरद पवारांनी मुंबई पोलिसांवर होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
पवारांकडून अनेक जुन्या आठवणींना उजाळा
“हेमंत करकरे यांच्या जाण्याने कमकरता भासते. कोणतीही परिस्थिती नियंत्रणात आणणारच असे ते अधिकारी होते. एका चांगल्या अधिकाऱ्याला देश आणि महाराष्ट्र मुकला. अशोक कामटे सुद्धा उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांना सुद्धा आपण मुकलो”, असं म्हणत शरद पवारांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पाली हिलमधील कार्यालयावर हातोडा, आता खारमधील फ्लॅटवर कारवाईसाठी महापालिकेची पावले https://t.co/PSz7bpCGsD #KanganaRanaut #Khar
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2020
Sharad Pawar On Kangana Ranaut
संबंधित बातम्या :
Kangana Office Demolish | बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना
याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार