शरद पवार स्वीय सहायक्कांना कविता सादर करायला सांगतात तेव्हा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत सोशल मीडियावर आपल्या लिखाणामुळे नेहमीच चर्चेत असतात.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत सोशल मीडियावर आपल्या लिखाणामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच मंगळवारी (20 ऑगस्ट) अहमदनगर येथे शरद पवारांनी सतीश राऊत यांना कविता सादर करायला सांगितली. यावेळी राऊत यांनी स्वत: दुष्काळावर लिहिलेल्या कवितेचं सादरीकरण केले.
अहमदनगरमधील कर्जत येथे कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तो कार्यक्रम उरकून शरद पवार यांनी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्या ठिकाणी भेटीगाठी झाल्यानंतर गप्पांची मैफल रंगलीह होती. याच दरम्यान शरद पवार यांनी अचानकपणे आपले स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना कविता सादर करायला सांगितलं. साहेबांचा अचानक आदेश आल्यानंतर सतीश राऊत काही वेळ गोंधळून गेले. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतः लिहिलेल्या दुष्काळावरील कवितेचं सादरीकरण करत साहेबांसह उपस्थितांची वाहवा मिळवली.
सतीश राऊत यांनी सादर केलेल्या कवितेचा व्हिडीओ सध्या मोठ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच राऊत यांनी सादर केलेल्या कवितेचंही अनेकांकडून कौतुक करण्यात येत आाहे.